भारतीय वंशाचा निखिल चौधरी ऑस्ट्रेलियातील बीग बॅश लीगमध्ये खेळतो. होबार्ट हरिकेन्स संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले आहे. निखिलने ऑस्ट्रेलियाचीतल क्वींसलँड याठिकाणी राहणाऱ्या एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर लावला गेला आहे. असे असले तरी भारतीय वंशाच्या या क्रिकेटपटूने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
निखिल चौधरी () भारतात देशांतर्गत क्रिकेट खेळले असून पंजाब संघाकडून त्याला ही संधी मिळाली होती. पण नंतर तो ऑस्ट्रेलियाला गेला. ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यानंतरही त्याने क्रिकेट खेळणे सुरूच ठेवले. सोबतच पोस्टमन म्हणून नोकरी देखील करू लागला. माहितीनुसार 2020 साली सुट्ट्यांमध्ये तो ऑस्ट्रेलियाला गेला होता. पण कोरोना महामारी आल्यानंतर तो त्याठिकाणीच अडकला. जास्त दिवस त्याठिकाणी थांबावे लागल्याने त्याने ब्रिस्बेनच्या उत्तरेकडील उपनागरील एका क्रिकेट क्लबमध्ये त्याने दाखला घेतला. याच ठिकाणी त्याची गुणवत्ता सर्वांना समजली आणि नंतर होबार्ट हरिकेन संघाकडून बीबीएल 2023 मध्ये त्याची निवड झाली.
माध्यमांतील वृत्तांनुसार बीग बॅश लीगमध्ये केळणारा भारतीय वंशाचा निखिल चौधरी याने क्वींसलँडमध्ये राहणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिनेवचे लैंगिक शोषण केले. पण क्रिकेटवटूने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माहितीनुसार निखिल आणि या महिलेची भेट टाउन्सविलेच्या एका नाईट क्लबमध्ये झाली होती. निखीलने या महिलेला आपल्या गाडीत नेले आणि त्याठिकाणी हे दुष्कर्म केल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी (25 मार्च) या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली असून निखीलने स्वतःला निर्दोष सांगितले आहे.
दरम्यान, भारतीय क्रिकेटपटूची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी पाहिली, तर त्याने आतापर्यंत 2 लिस्ट एक आणि 21 टी20 सामने खेळले आहेत. लिस्ट एच्या दोन सामन्यांमध्या त्याने 25 धावा केल्या असून एक विकेट घेतली आहे. तर टी-20 मध्ये 16 डावांमध्ये 260 धावा केल्या आहेत आणि 12 विकेट्स त्याला मिळाल्या आहेत. (BBL-playing Indian-origin cricketer accused of sexual harassment by woman)
महत्वाच्या बातम्या –
हिटमॅनकडून सर्वांना ‘हॅप्पी होळी!’, पाहा रोहित शर्माचा रंगांसोबत खेळतानाचा व्हिडिओ
“भारतीय खेळाडूचा असा अपमान कधीच पाहिला नाही”, हार्दिक पांड्याविरुद्धच्या हूटिंगवरून विदेशी खेळाडूही हैराण