क्रिकेटमध्ये नवीन आणि क्रांतिकारी नियम लागू करण्याचा प्रस्ताव आला आहे. आतापर्यंत गोलंदाजांच्या चुकीमुळे फलंदाजांना फ्री हिट मिळत असत. पण प्रस्तावित नवीन नियमानुसार गोलंदाजांना ‘फ्री हिट’ मिळू शकते. या नवीन क्रांतिकारी नियमाची शिफारस करण्यात आली आहे. कारण, फलंदाज सामन्यादरम्यान बराच वेळ वाया घालवतात. ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीगमध्ये हा नियम लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
बीबीएल प्रमुख या नियमाचा विचार करत आहेत, या नियामानुसार जर गोलंदाजाला फ्री हिट मिळाली, तर फलंदाज स्टंप पूर्णपणे मोकळे सोडून बाजूला उभा राहील आणि गोलंदाज विकेट घेण्याचा प्रयत्न करेल. जर गोलंदाजाने त्रिफळा उडवला, तर तो फलंदाज बाद समजला जाईल. जर गोलंदाज विकेट घेऊ शकला नाही, तर फलंदाज पुढे फलंदाजीला सुरुवात करू शकेल.
बीबीएलच्या मागील हंगामातील सामने निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ चालले होते. व्यवस्थापनाने चाहत्यांच्या तक्रारी ऐकल्या आणि आता अशा फलंदाजांवर कडक कारवाई करण्याची तयारी केली आहे, ज्यांना खेळपट्टीवर पोहोचण्यास जास्त वेळ लागतो. बीबीएलच्या गेल्या हंगामात अशी अनेक उदाहरणे होती जेव्हा फलंदाजांना खेळपट्टीवर पोहोचण्यास दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला. यामुळे सामने रात्री उशिरापर्यंत चालले होते. बीबीएलच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये, सामने फक्त तीन तासात संपत असत, परंतु अलीकडच्या काळात ते साडे तीन तासाच्या पुढे वेळ घेत आहेत.
अहवालानुसार, फलंदाजांना खेळपट्टीवर पोहोचण्यासाठी ७५ सेकंद ठेवले जातील. हा नियम बीबीएलच्या महिला आणि पुरुष दोन्ही स्पर्धांमध्ये लागू होईल. जर एखादा फलंदाज ७५ सेकंदात खेळपट्टीवर पोहोचला नाही, तर त्याला गोलंदाजांकडून फ्री हिट चेंडूंचा सामना करावा लागेल, जो गेम चेंजर देखील ठरू शकतो. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अद्याप या नियमास निश्चित केलेले नाही. परंतु हा नियम लागू होण्याची दाट शक्यता आहे.
बिग बॅश लीगचे महाव्यवस्थापक ऍलिस्टर डॉब्सन म्हणाले, आम्हाला माहित आहे की, बिग बॅशच्या चाहत्यांना टीव्हीवर आणि स्टेडियममध्ये वेगवान आणि रोमांचक क्रिकेट पाहायचे आहे. ते म्हणाले की, एखादा फलंदाज त्याच्या बाद होण्याचा धोका पाहून स्वतःला बदलेल आणि त्यामुळे लीगला नक्कीच चांगली गती मिळेल. तसेच सामनेही वेळेत संपतील.
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआयची मोठी घोषणा! ‘या’ दिवशी टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची नवी जर्सी होणार लॉन्च
भारताला विश्वचषकात हरवले, मिळेल कोरा चेक, पाकिस्तान संघाला मोठी ऑफर
‘ना राष्ट्रीय संघासाठी काही केलं, ना आयपीएल फ्रँचायझीसाठी’, RRच्या खेळाडूला गावसकरांचा चिमटा





