---Advertisement---

बीसीसीआयनं चक्क दुसऱ्या देशाच्या टीमला दिले 3 ‘होम ग्राऊंड्स’, भारतात होणार कसोटी सामने

Shaheed Veer Narayan Singh International Stadium, Raipur
---Advertisement---

तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला सतत मदत करत आहे. आता अफगाणिस्तानचा संघ न्यूझीलंडसोबत कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. अफगाणिस्तान घरच्या मैदानावर कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळत नाही. त्यामुळे अफगाणिस्तानचा संघ भारतीय भूमीवर न्यूझीलंडसोबत पहिला कसोटी सामना खेळणार आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून बीसीसीआय हे एकमेव क्रिकेट बोर्ड आहे जे अफगाणिस्तानला मदत करत आहे. वृत्तानुसार, अफगाणिस्तान आपला एकमेव कसोटी सामना ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंह पथिक क्रीडा संकुलात खेळू शकतो. हा सामना सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. यानंतर न्यूझीलंडला टीम इंडियासोबत भारतातच 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. जी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आयोजित केली जाणार आहे.

वृत्तानुसार, बीसीसीआयनं अफगाणिस्तानला आपले सामने आयोजित करण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. अफगाणिस्तानला जुलैमध्येच बांगलादेशसोबत एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळायची होती, मात्र, उत्तर भारतातील कडक उन्हामुळे ही मालिका रद्द करण्यात आली. आता अफगाणिस्तानचा संघ चार वर्षांनंतर पुन्हा एकदा ग्रेटर नोएडाच्या स्टेडियममध्ये खेळणार आहे. 2020 मध्ये ते येथे शेवटचं खेळले होते.

आतापर्यंत अफगाणिस्तान क्रिकेट संघानं फक्त 9 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यापैकी संघानं 3 सामने जिंकले आणि 6 सामने गमावले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अफगाणिस्तान एक मजबूत संघ म्हणून समोर आला आहे. त्यांनी अनेक मोठ्या संघांना पराभूत केलं आहे. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात अफगाणिस्ताननं उपांत्य फेरी पर्यंत मजल मारली होती. या स्पर्धेत त्यांनी बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांचा पराभव केला होता. यावरून त्यांचा संघ आता किती धोकादायक झाला आहे हे दिसून येतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

“सूर्यकुमार यादव चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार नाही”…माजी खेळाडूची भविष्यवाणी; या खेळाडूचं स्थान निश्चित
श्रीलंकेचे 3 खेळाडू, जे टी20 मालिकेत भारतासाठी मोठा धोका ठरू शकतात
“मोठ्यांना कसे बोलावे शिकवले नाही का?” माजी पाकिस्तानी खेळाडूनं मोहम्मद शमीला खडसावलं

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---