---Advertisement---

आयपीएल २०२२ चे वेळापत्रक जाहीर होण्यास का होतोय विलंब? कारण आले पुढे

On: रविवार, फेब्रुवारी 20, 2022 10:31 PM
IPL-Trophy
---Advertisement---

काही दिवसांपूर्वी आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने मेगा लिलाव आयोजित केला होता. मेगा लिलावानंतर चाहत्यांना लीग कधी सुरू होते, याची उत्सुकता लागली आहे. परंतु त्यापूर्वी आगामी आयपीएलचे वेळापत्रक जाहीर होणे गरजेचे आहे. बीसीसीआयने अद्याप जाहीर केले नाहीय की, आयपीएल २०२२ ची सुरुवात नेमकी कधी होणार आहे? वेळापत्रक जाहीर करण्यासाठी उशीर झाला आहे आणि माध्यमांमध्ये अशी माहिती समोर येत आहे की, बीसीसीआय (BCCI) आणि प्रसारक डिज्नी-स्टार (disney-star) यांच्यात स्पर्धा सुरू करण्याची तारीख निश्चित होत नाहीय.

मागच्या महिन्यातील बैठकीत बीसीसीआयने सांगितले होते की, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात स्पर्धा सुरू करण्याची योजना आहे. असे सांगितले जात होते की, रविवारी (२७ मार्च) पहिला सामना खेळवला जाईल. पण स्टार मात्र एक दिवस आधी म्हणजेच २६ मार्चला स्पर्धेची सुरुवात करू इच्छित आहे. माहितीनुसार स्टार २६ मार्चला स्पर्धेची सुरुवात करू इच्छित आहे, जेणेकरून रविवारी (२७ मार्च) ‘डबल हेडर’ (एका दिवसात दोन सामने) आयोजित करता येतील. परंतु बोर्ड याच्याशी सहमत दिसत नाहीय.

बीसीसीआय डिज्नी-स्टारची अट मान्य करणार ?

शनिवारी जर स्पर्धेची सुरुवात झाली, तर पहिल्या दिवशी एक आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी दोन सामने खेळवता येऊ शकतात. जर असे झाले, तर डिज्नी-स्टारच्या मते नवीन हंगामाची जोरदार सुरुवात होऊ शकते. पण जर स्पर्धा रविवारी सुरू झाली आणि सोमवारी दोन सामने आयोजित केले गेले, तर टीव्हीवर अपेक्षित प्रेक्षक मिळणार नाहीत आणि स्पर्धेची सुरुवातही अपेक्षित होऊ शकणार नाही. याच पार्श्वभूमीवर बोर्ड आणि प्रसारक डिज्नी-स्टारमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाईल. कारण बोर्ड प्रसारक डिज्नी-स्टारची अट मान्य करेल, अशी शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---