---Advertisement---

WTC फायनल पराभवातून भारताला मिळाला धडा, कसोटी मालिकेपुर्वी ईसीबीला केली ‘ही’ विनंती

---Advertisement---

जगाच्या पाठीवर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, तिथे जाण्याअगोदर तुम्हाला तेथील गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. मग त्यात क्रिकेट का असेना. कोणत्याही क्रिकेट संघाला परदेशी दौऱ्यावर जायचे असल्यास, त्यांना तेथील परिस्थिती आणि वातावरणाशी जुळवण घ्यावे लागते. म्हणूनच मालिकेपुर्वी यजमान देशात १-२ सराव सामने खेळण्यावर पाहुणे संघ भर देत असतात.

दोन दिवसांपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात भारतीय संघाला याच गोष्टीची किंमत मोजावी लागली. कसोटी अजिक्यपद स्पर्धेत न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला ८ गडी राखून पराभूत केले. तत्पुर्वी न्यूझीलंडने सरावाच्या रुपात इंग्लंडविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. परंतु भारतीय संघाला ही संधी मिळाली नव्हती.

आता भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध इंग्लंडच्या भूमीत ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघाने विश्व कसोटी अजिंक्यपद सामना खेळण्याचा पूर्वी एकही सराव सामना खेळला नव्हता. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ  (बीसीसीआय)यांनी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यापूर्वी भारतीय संघाला २ सराव सामने खेळण्याची मुभा द्यावी अशी विनंती इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे केली आहे.

बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “जय शाह ईसीबी आणि मुख्य कार्यकारी अधिकरी टॉम हैरिसन यांना विनंती करणार आहेत की, कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी २ सराव सामन्यांची व्यवस्था करण्यात यावी. येत्या कसोटी मालिकेत खेळाडूंना इंग्लंडमधील वातावरण आणि खेळपट्टीचा सराव व्हावा यासाठी २ सराव सामन्यांचे आयोजन ईसीबीने करावे.”

अजून ही बाब स्पष्ट झाली नाही की, सराव सामने ३ दिवसांचे असतील की चार. पण न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवातून धडा घेत बीसीसीआयने इंग्लंडविरुद्ध कमीतकमी २ सराव खेळवण्याची विनंती केली आहे. भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध ४ ऑगस्टपासून पहिला कसोटी सामना नॉटिंघम येथे खेळेल.

महत्त्वाच्या बातम्या-

सलग दुसरा सामना जिंकत इंग्लंडने केले ‘लंकादहन’, टी२० मालिका घातली खिशात

INDvNZ: कर्णधार कोहलीचे टीकाकारांना सणसणीत प्रत्युत्तर; म्हणाला, ‘हा एक संघ नसून…’

PSLला मिळाला नवा विजेता, शोएबच्या आतिशी खेळीने मुल्तान सुल्तानचा ४७ धावांनी दणदणीत विजय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---