भारतीय क्रिकेट संघ पुढील आठवड्यात सुरू होत असलेल्या आशिया चषकात सहभागी होणार आहे. भारताचा हा राष्ट्रीय संघ युएईत खेळत असताना, इंडिया ए संघ मायदेशात न्यूझीलंड ए विरुद्ध दोन हात करेल. दौऱ्याच्या सुरुवातीला होणाऱ्या चार दिवसीय प्रथमश्रेणी मालिकेसाठी निवडसमितीने संघ जाहीर केला असून, गुजरातचा अनुभवी सलामीवीर प्रियंक पांचाल हा संघाचे नेतृत्व करेल.
NEWS – India A squad for four-day matches against New Zealand A announced.@PKpanchal9 to lead the team for the same.
Full squad details here 👇https://t.co/myxdzItG9o
— BCCI (@BCCI) August 24, 2022
सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंड अ संघ भारताचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात उभय संघात १ ते २७ सप्टेंबर दरम्यान ३ चारदिवसीय प्रथमश्रेणी व तीन वनडे सामने खेळले जाणार आहेत. हे सामने भारतातील बेंगलोर आणि चेन्नई शहरात होतील. त्यातील प्रथमश्रेणी मालिकेसाठी संघाची घोषणा करताना प्रियांक पांचालकडे नेतृत्व दिले गेले. मागील काही दिवसांपासून शुबमन गिल व हनुमा विहारी यांना देखील नेतृत्व देण्याविषयी चर्चा होत होती. मात्र, या दोघांना संघात स्थानही मिळाले नाही.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सरफराज खान, तिलक वर्मा, उपेंद्र यादव, मुकेश चौधरी व यश दयाल यांना पहिल्यांदाच ए संघात प्रथमच स्थान दिले गेले आहे.
न्यूझीलंड ए संघ सात वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारताच्या दौऱ्यावर येतोय. त्यांनी यापूर्वीच आपल्या संघाची घोषणा केली असून, या संघात सात आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यासाठी न्यूझीलंड ए ने दोन कर्णधारांची नावे घोषित केली आहेत. अनुभवी अष्टपैलू टॉम ब्रूस व रॉबी ओडोनील संघाचे नेतृत्व करतील.
न्यूझीलंड ए विरुद्ध चारदिवसीय सामन्यांसाठी इंडिया ए संघ:-
प्रियांक पांचाल (कर्णधार), अभिमन्यू ईस्वरन, ऋतुराज गायकवाड, रजत पाटीदार, सरफराज खान, तिलक वर्मा, केएस भरत, उपेंद्र यादव, कुलदीप यादव, सौरभ कुमार, राहुल चहर, प्रसिद्ध कृष्णा, उमरान मलिक, मुकेश चौधरी, यश दयाल, अरझान नागवासवाला.
महत्त्वाच्या बातम्या-