भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादीत षटकांच्या मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या मालिका झाल्या की भारतीय संघाला श्रीलंकाविरुद्ध ३ टी२० आणि २ कसोटी सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. या मालिकांसाठी श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. दरम्यान, या मालिकांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आल्याची माहिती मंगळवारी (१५ फेब्रुवारी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिली आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार आता भारत आणि श्रीलंका संघात पहिल्यांदा टी२० मालिका खेळली जाईल, त्यानंतर कसोटी मालिका खेळली जाणार आहे. कसोटी मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असणार आहे. टी२० मालिकेला २४ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे, तर कसोटी मालिकेला ४ मार्चपासून सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे.
टी२० मालिकेतील पहिला सामना लखनऊ येथे खेळला जाईल, तर अखेरचे दोन सामने धरमशाला येथे होतील. तसेच कसोटी मालिकेतील पहिला सामना मोहालीला आणि दुसरा सामना बंगळुरू येथे होईल.
भारत विरुद्ध श्रीलंका २०२२
टी२० मालिका
२४ फेब्रुवारी – पहिला सामना – लखनऊ
२६ फेब्रुवारी – दुसरा सामना – धरमशाला
२७ फेब्रुवारी – तिसरा सामना – धरमशाला
कसोटी मालिका –
४-८ मार्च – पहिला सामना – मोहाली
१२-१६ मार्च – दुसरा सामना – बंगळुरु (दिवस-रात्र)
महत्त्वाच्या बातम्या –
स्वतः कर्णधार रोहित म्हणतोय, “आयपीएल नाही देशासाठी खेळण्यावर लक्ष द्या”; वाचा सविस्तर
साथ सुटली! ‘या’ ६ खेळाडूंनी पहिल्या-वहिल्या आयपीएल संघांना २०२२ हंगामापूर्वी ठोकला राम-राम
IPL 2022: केएल राहुलची किंमत पीएसएलच्या महागड्या बाबरपेक्षा १३ पट अधिक; बीबीएल, सीपीएल आसपासही नाही