---Advertisement---

महिला आयपीएलमध्येही दिसणार मुंबईचा संघ; इतक्या कोटींची बोली लावत अंबानींनी मारली बाजी

On: बुधवार, जानेवारी 25, 2023 4:10 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चालू वर्षी पहिल्या महिला आयपीएल या स्पर्धेचा घाट घातला आहे. काही दिवसांपूर्वीच स्पर्धेचे प्रसारण हक्क तब्बल 951 कोटींना विकले गेले होते. त्यानंतर महिला आयपीएलच्या संघ मालकीसाठी नुकतीच बोली प्रक्रिया पार पडली. बुधवारी (25 जानेवारी) झालेल्या या प्रक्रियेत नवे पाच संघ,‌ त्यांच्या संगमालाक व त्यांना मिळालेल्या रकमेची घोषणा बीसीसीआयकडून केली गेली. तसेच यावेळी स्पर्धेचे नामकरणही करण्यात आले.

https://twitter.com/BCCI/status/1618181540323946502?t=13Xdt7dm4mIbWEEyLkWLRw&s=19

 

बीसीसीआयने मागवलेल्या संघमालकीच्या प्रक्रियेसाठी आठ आयपीएल फ्रॅंचाईजीसह देशभरातील तसेच विदेशातील विविध उद्योग समूहांनी रस दाखवलेला. पाच संघांच्या या स्पर्धेसाठी बीसीसीआयने दहा शहरे निश्चित केलेली. त्यानंतर बुधवारी सर्वाधिक बोली लागलेला पाच शहरांना मालकी हक्क प्रदान केले गेले.

https://twitter.com/JayShah/status/1618178527496634369?t=Foa39iCv_nyy7PXEi0nGPA&s=19

 

भारतातील अग्रगण्य उद्योग समूह असलेल्या अदानी स्पोर्ट्सलाईन ग्रुपने अहमदाबाद फ्रॅंचायजी सर्वात महाग अशा 1289 कोटी रुपयांना आपल्या नावे केली. पुरुष आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रॅंचायजी असलेल्या मुंबई इंडियन्सचे मालकी हक्क असलेल्या रिलायन्स ग्रुपच्या इंडियाविन स्पोर्ट्स यांनी 901 कोटी रुपयांची बोली लावत मुंबई फ्रॅंचायजी आपल्याकडे ठेवली. पुरुष आयपीएलमधील इतर दोन संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी 901 कोटी रुपयांना बेंगलोर तर, दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक असलेल्या जेएसडब्ल्यू ग्रुपने 810 कोटींना दिल्ली फ्रॅंचायजी मिळवली. तर, कॅप्री ग्लोबल कॅपिटल यांनी 757 कोटींना लखनऊ फ्रॅंचाईजी आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. या सर्व संघांनी एकत्रितपणे लावलेल्या या बोलींमुळे पहिल्याच वर्षी या स्पर्धेचे मूल्य 4669.99 कोटी इतके झाले. पुरुष आयपीएलच्या पहिल्या वर्षी इतकी रक्कम बीसीसीआयलख मिळाली नव्हती.

यासोबतच बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ही स्पर्धा वुमन्स प्रीमियर लीग या नावाने ओळखले जाईल असे देखील घोषित केले.

(BCCI Announced Five Team Owners Of Women’s IPL It Named As WPL)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ICC ODI Rankings: शानदार शुबमनसह रोहितही टॉप 10मध्ये, पण विराटला बसला फटका
सिराजच्या शिरपेचात मानाचा तुरा, भल्याभल्यांना पछाडत वनडे रँकिंगमध्ये बनला अव्वल गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---