बीसीसीआयनं महिला आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. ही स्पर्धा 19 जुलैपासून सुरू होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघानं आतापर्यंत विक्रमी 7 वेळा आशिया कप जिंकला आहे. यंदा टीम इंडिया आठव्यांदा कप जिंकण्याच्या इराद्यानं उतरणार आहे. आशिया कपमध्ये भारतीय संघाची कमान अनुभवी हरमनप्रीत कौरच्या हाती असेल. याशिवाय दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्मृती मंधानाला उपकर्णधारपद देण्यात आलंय.
आशिया कपसाठी भारतीय संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील आणि सजना सजीवन
राखीव खेळाडू – श्वेता सेहरावत, सायका इशाक, तनुजा कंवर आणि मेघना सिंग
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गट ‘अ’ मध्ये आहे. भारताव्यतिरिक्त या गटात पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती आणि नेपाळचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान 19 जुलैला आमनेसामने येणार आहेत. यानंतर भारत आणि संयुक्त अरब अमिरातीचा संघ 21 जुलैला आमनेसामने येतील. तर भारत आणि नेपाळ यांच्यात 23 जुलै रोजी सामना होणार आहे. भारतीय संघ आपले सर्व सामने डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळणार आहे.
2004 मध्ये पहिल्या महिला आशिया कपचं आयोजन करण्यात आलं होते. आतापर्यंत ही स्पर्धा 8 वेळा आयोजित करण्यात आली आहे, ज्यामध्ये भारतीय संघानं विक्रमी 7 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. तर बांगलादेशचा संघ एकदा चॅम्पियन झाला आहे. भारत आणि बांगलादेश वगळता इतर कोणत्याही संघांला अद्याप ट्रॉफी जिंकण्यात यश आलेलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा एकतर्फी पराभव! युवराज-भज्जी सारखे दिग्गज सपशेल अपयशी
हा पराभव टीम इंडिया कधीच विसरणार नाही, झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघाच्या नावे अनेक लाजिरवाणे विक्रम
तीनही आयसीसी ट्रॉफी जिंकणारा इतिहासातील एकमेव कर्णधार! एक नजर एमएस धोनीच्या विक्रमांवर