क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आयपीएल २०२२ च्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामाचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात २६ मार्च रोजी ७.३० वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडणार आहे.
या स्पर्धेतील दुसरा सामना २७ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात खेळवला जाईल. आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्सचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध होणार आहे. हा सामनाही २७ मार्चला डी.वाय. पाटील स्टेडिअममध्ये खेळला जाईल. या हंगामात नव्याने सहभागी झालेले दोन संघ लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स संघ २८ मार्च रोजी एकमेकांचा सामना करतील. हे दोन्ही संघ आपला पहिला सामना वानखेडे स्टेडिअममध्येच खेळतील.
या हंगामातील शेवटचा साखळी सामना २२ मे रोजी खेळला जाईल. हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स संघात होणार आहे. हा सामनादेखील मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडणार आहे.
आयपीएल २०२२ च्या तारखा घोषित
आयपीएलचा २०२२ या वर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होणार असून २९ मे रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. यादरम्यान एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. यातील ७० सामने साखळी फेरीत होतील, तर ४ सामने प्लेऑफचे असतील.
महाराष्ट्रात होणार साखळी फेरी
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने घेतलेल्या निर्णयानुसार आयपीएल २०२२ मधील साखळी फेरीचे सर्व ७० सामने महाराष्ट्रात खेळवण्यात येणार आहेत. यामागे कोविड-१९ च्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन जास्तीचा विमानप्रवास टाळणे हे मुख्य कारण आहे. गेल्या दोन हंगामात कोविड-१९ चा मोठा फटका या स्पर्धेला बसला आहे. त्यामुळे यंदा हा धोका टाळण्यासाठी साखळी फेरीतील सर्व सामने मुंबई आणि पुणे या दोनच शहरात खेळवले जाणार आहेत.
साखळी फेरीतील ५५ सामने मुंबईत खेळवले जातील. हे ५५ सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील अशा तीन वेगवेगळ्या स्टेडियमवर खेळवले जातील. त्याचबरोबर साखळी फेरीचे १५ सामने पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियवर खेळवले जातील. तसेच प्लेऑफच्या ४ सामन्यांसाठी अद्याप ठिकाण ठरवण्यात आलेले नाही.
असे आहे आयपीएल २०२२ चे वेळापत्रक
सर्व संघ साखळी फेरीतील प्रत्येकी ४ सामने वानखेडे स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर खेळतील, तर प्रत्येकी ३ सामने ब्रेबॉर्न स्टेडियम आणि गहुंजे येथे खेळतील.
महत्त्वाच्या बातम्या-
वॉर्नच्या आकस्मित निधनानंतर मुलांना बसलाय मानसिक धक्का; सातत्याने…
विश्वचषक गाजवणारा परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप न पाडू शकणारा कायरन पॉवेल
“जडेजा बेन स्टोक्सपेक्षा खूप पुढे आहे”, माजी भारतीय क्रिकेटरकडून कौतुकाची थाप