भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या कसोटी मालिकेनंतर तीन सामन्यांची वनडे मालिका देखील खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी रविवारी (19 फेब्रुवारी) संघ जाहीर करण्यात आला. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सामन्यात कौटुंबिक कारणाने उपस्थित नसेल. त्याच्या जागी हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करणार आहे.
India’s ODI squad vs Australia
Rohit Sharma (C), S Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, KL Rahul, Ishan Kishan (wk), Hardik Pandya (VC), R Jadeja, Kuldeep Yadav, W Sundar, Y Chahal, Mohd Shami, Mohd Siraj, Umran Malik, Shardul Thakur, Axar Patel, Jaydev Unadkat
— BCCI (@BCCI) February 19, 2023
दिल्ली येथील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर बीसीसीआयने लगेचच उर्वरित दोन सामन्यांसाठी व वनडे मालिकेसाठी संघ घोषित केला. 17 मार्चपासून मुंबई येथे या मालिकेला सुरुवात होईल. मात्र, कौटुंबिक कारणाने नियमित कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात सहभागी होणार नाही. त्यामुळे हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करेल. याच मालिकेतून रवींद्र जडेजा पुन्हा एकदा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. तसेच, अनुभवी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकत तब्बल दहा वर्षानंतर वनडे संघात दिसेल.
भारतीय संघाच्या आसपास असलेले पृथ्वी शॉ, संजू सॅमसन, फिरकीपटू रवी बिश्नोई व वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना या मालिकेसाठी संधी मिळाली नाही. खराभ फॉर्ममध्ये असलेला केएल राहुल हा मात्र वनडे संघातील आपली जागा राखण्यात यशस्वी ठरला. इशान किशन याला देखील संघ व्यवस्थापनाने आणखी एक संधी दिली आहे.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज , उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.
(BCCI Announced Sqaud For ODI Series Against Australia Unadkat Makes Comeback)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! टीम इंडियाकडून 6 विकेट्सने ऑस्ट्रेलियाचा सुफडा साफ, 36 वर्षांच्या विक्रमाला धक्काही लागला नाही
किंग कोहलीचा भीम पराक्रम! 25000 धावांचा टप्पा पार करताच मोडला ‘मास्टर ब्लास्टर’चाही World Record