पुढील वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत पहिला महिला अंडर 19 विश्वचषक खेळला जाणार आहे. या विश्वचषकासाठी सोमवारी (5 डिसेंबर) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व वरिष्ठ संघाची सलामीवीर असलेल्या शफाली वर्माकडे दिले आहे. तसेच, वरिष्ठ संघात खेळलेली रिचा घोष हीदेखील या संघाचा भाग असेल. विश्वचषकासोबतच दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी देखील निवड समितीने आपला संघ जाहीर केला.
🚨 NEWS 🚨: India U19 Women’s squad for ICC World Cup and SA series announced.
More Details 🔽https://t.co/onr5tDraiq
— BCCI Women (@BCCIWomen) December 5, 2022
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) प्रथमच अंडर 19 महिला विश्वचषक स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये एकूण 16 संघ सहभागी होतील. भारताला यजमान दक्षिण आफ्रिका, स्कॉटलंड व यूएईसह ड गटामध्ये स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर-6 मध्ये जातील. या फेरीत संघांची दोन गटात विभागणी करण्यात येणार आहे. येथून अव्वल चार संघ उपांत्य फेरीत खेळतील. अंतिम सामना २९ जानेवारीला होईल.
या विश्वचषकापूर्वी भारतीय संघ 27 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेसोबत पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे.
नेतृत्व मिळालेल्या शफालीने वरिष्ठ भारतीय संघासाठी 2 कसोटी, 21 वनडे व 46 टी20 सामने खेळले आहेत.तर, रिचा घोष हिला 17 वनडे व 25 टी20 सामने खेळण्याचा अनुभव आहे.
महिला अंडर 19 क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघ-
शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), जी. त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हुर्ले गाला, ऋषिता बसू (यष्टीरक्षक), सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, प्रश्वी चोप्रा, तीतस साधू, फलक नाझ, शबनम एमडी, शिखा नाझला सीएमसी, यशश्री.
(BCCI Announced Sqaud For Womens U19 World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रीय संघाकडून सुट्टी मिळाली असताना सूर्यकुमार डॉमेस्टिकमध्ये करणार धमाका, एमसीए अधिकाऱ्याची माहिती
विश्वचषकासाठी ‘हा’ खेळाडू प्रबळ दावेदार, दिनेश कार्तिकने व्यक्त केले मत