यंदाच्या दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीसाठी पुरुष निवड समितीने संघात काही बदल केले आहेत. दुसरी फेरीला 12 सप्टेंबरपासून अनंतपुरात सुरूवात होणार आहे. भारत अ संघाचा कर्णधार शुबमन गिल, केएल राहुल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव आणि आकाशदीप यांची बांग्लादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी संघात निवड करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत हे सर्व खेळाडू दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत सहभागी होऊ शकणार नाहीत.
प्रथम सिंग शुबमन गिलची जागा घेईल, अक्षय वाडकर केएल राहुलची जागा घेईल, एसके रशीद ध्रुव जुरेलची जागा घेईल, शम्स मुलानी कुलदीप यादवची जागा घेईल आणि आकिब खान भारत अ मध्ये आकाशदीपची जागा घेईल. मयंक अग्रवाल भारत अ संघाचा कर्णधार असेल.
भारत अ संघ : मयंक अग्रवाल (कर्णधार), रायन पराग, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, प्रसिध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, कुमार कुशाग्रा, शास्वत रावत, प्रथम सिंग, अक्षय वाडकर, एसके रशीद, शम्स मुलाणी, आकिब खान .
भारत ‘ब’ बद्दल बोलायचे झाल्यास यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत यांना बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी संघात स्थान मिळाले आहे. सुयश प्रभुदेसाई यशस्वीच्या जागी इंडिया बी मध्ये तर रिंकू सिंग रिषभ पंतची जागा घेईल. यश दयाललाही कसोटी संघात स्थान मिळाले आहे. तर सर्फराज खानही बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी संघाचा एक भाग आहे. पण हे दोघेही दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत खेळताना दिसणार आहेत.
भारत ब संघ : अभिमन्यू इसवरन (कर्णधार), सरफराज खान, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीसन, सुयश प्रभुदेसाई, रिंकू सिंग, हिमांशू मंत्री
तर भारत ‘क’ संघामध्ये मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ज्याचे नेतृत्तव ऋतुराज गायकवाड करत आहे.
अक्षर पटेल इंडिया ‘डी’ मधून भारतीय संघात सामील होईल आणि त्याच्या जागी निशांत सिद्धू इंडिया ‘डी’ मध्ये सामील होईल. तुषार देशपांडे दुखापतीमुळे दुसऱ्या फेरीत खेळू शकणार नाही आणि त्याच्या जागी विद्वत कवेरप्पा इंडिया ‘डी’ संघात सामील झाला आहे.
भारत ड संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, सरांश जैन, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, आकाश सेनगुप्ता, केएस भरत, सौरभ कुमार, संजू सॅमसन, निशांत सिंधू, विद्वथ कवेरप्पा
हेही वाचा-
ऑस्ट्रेलियाची मोठी खेळी, भारताविरुद्ध हा फलंदाज करणार सलामी बाॅर्डर-गावस्कर मालिकेसाठी संघाची नवी चाल?
‘विनेश’च्या राजकारणातील प्रवेशामुळे महावीर फोगट दु:खी, म्हणाले ‘तिने सुवर्णपदक….’
श्रीलंकेच्या विजयाने WTC मध्ये भारताचा खेळ खराब? पाहा अपडेटेड पॉइंट टेबल