आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदात मोठा बदल करण्यात आला आहे. या मालिकेतून हरमनप्रीत कौर आणि वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे अनुभवी सलामीवीर स्मृती मानधना आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.
भारतीय महिला संघाला 10 जानेवारीपासून आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना 10 जानेवारी रोजी राजकोट येथे होणार आहे. यानंतर दुसरा सामना 12 जानेवारीला आणि तिसरा आणि शेवटचा सामना 15tea जानेवारीला खेळवला जाईल. अशा परिस्थितीत नुकतीच संघाची घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय संघाने अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली होती. आता संघाला आयर्लंडविरुद्धही अशीच कामगिरी करायला आवडेल. या मालिकेबद्दल बोलायचे झाले तर स्मृती मानधनाची कर्णधार आणि दीप्ती शर्माची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय प्रतिका रावल, हरलीन देओल आणि जेमिमाह रॉड्रिग्स या खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे. या संघातील बहुतेक खेळाडूंना संधी मिळाली आहे, ज्यांना सतत खेळण्याची संधी मिळत नाही.
हरमनप्रीत कौरच्या कर्णधारपदावर बऱ्याच दिवसांपासून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. विशेषतः ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर त्याच्यावर बरीच टीका झाली होती. अशा परिस्थितीत स्मृती मानधना यांचा पर्याय म्हणून विचार केला जात आहे.
???? ???????????????? ????#TeamIndia (Senior Women) squad for series against Ireland Women announced.
????????????????????: Harmanpreet Kaur and Renuka Singh Thakur have been rested for the series.
Details ???? #INDvIRE | @IDFCFIRSTBank
— BCCI Women (@BCCIWomen) January 6, 2025
आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय महिला संघ
स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, उमा छेत्री (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), तेजल हसबनीस, राघवी बिश्त, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, तितस साधू, सायमा ठाकोर आणि सायली सातघरे
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा कधी होणार? स्पर्धेचे ‘कट-ऑफ’ डेट समोर
काय सांगता! भारतीय संघ ऑस्ट्रेलियातच अडकला, परतीचे तिकिट मिळेना; मजेशीर कारण जाणून घ्या
‘त्याला माजी खेळाडूंशी…’, आऊट ऑफ फाॅर्ममध्ये असलेल्या ‘विराट’ला इरफान पठाणने सुनावले






