---Advertisement---

बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादी केली जाहीर, कोणत्या खेळाडूंना किती कोटी रुपये मिळणार?

On: सोमवार, एप्रिल 21, 2025 3:08 PM
---Advertisement---

बीसीसीआयने पुरुष क्रिकेटर खेळाडूंचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट घोषित केलं आहे, यामध्ये एकूण 34 खेळाडूंना 4 श्रेणीमध्ये सामील केलं आहे. सगळ्यात वरची श्रेणी ‘अ’ प्लस असते. ज्यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. मागच्या वर्षी सुद्धा हे खेळाडू या श्रेणीमध्ये होते. जाणून घ्या सर्व खेळाडूंना या श्रेणीमध्ये एकूण किती पैसे मिळतात.

बीसीसीआयने पाच नवीन खेळाडूंना या यादीमध्ये सामील केलं आहे. ज्यांना पहिल्यांदाच बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा आकाश दीप, अभिषेक शर्मा आणि वरून चक्रवर्ती या पाच खेळाडूंना पहिल्यांदा बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये सामील केलं आहे. तसेच चार असे खेळाडू आहेत, ज्यांना सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मधून बाहेर काढण्यात आलं आहे. शार्दुल ठाकूर, आवेश खान, के एस भरत आणि जितेश शर्मा यांना बाहेर काढण्यात आले आहे.

‘अ’प्लस श्रेणीतील खेळाडूंचा पगार

रोहित शर्मा – 7 करोड़
विराट कोहली – 7 करोड़
जसप्रीत बुमराह – 7 करोड़
रवींद्र जडेजा – 7 करोड़

‘अ’ श्रेणीतील खेळाडूंचा पगार आणि सामील खेळाडू

मोहम्मद सिराज – 5 करोड़
केएल राहुल – 5 करोड़
शुबमन गिल – 5 करोड़
हार्दिक पांड्या – 5 करोड़
मोहम्मद शमी – 5 करोड़
ऋषभ पंत – 5 करोड़

‘ब’ श्रेणीतील खेळाडूंचा पगार

सूर्यकुमार यादव – 3 करोड़
कुलदीप यादव – 3 करोड़
अक्षर पटेल – 3 करोड़
यशस्वी जयस्वाल – 3 करोड़
श्रेयस अय्यर – 3 करोड़

‘क’ श्रेणीतील खेळाडू आणि त्यांचा पगार

रिंकू सिंग- 1 करोड
तिलक वर्मा- 1 करोड
ऋतुराज गायकवाड़- करोड
शिवम दुबे – 1 करोड़
रवि बिश्नोई – 1 करोड़
वॉशिंग्टन सुंदर – 1 करोड़
मुकेश कुमार – 1 करोड़
संजू सॅमसन – 1 करोड़
अर्शदीप सिंग- 1 करोड़
प्रसिद्ध कृष्णा – 1 करोड़
रजत पाटीदार – 1 करोड़
ध्रुव जुरेल – 1 करोड़
सरफ़राज़ खान – 1 करोड़
नितीश कुमार रेड्डी – 1 करोड़
ईशान किशन – 1 करोड़
अभिषेक शर्मा – 1 करोड़
आकाश दीप – 1 करोड़
वरुण चक्रवर्ती – 1 करोड़
हर्षित राणा – 1 करोड़

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---