---Advertisement---

दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय अ संघ जाहीर

On: सोमवार, जुलै 23, 2018 6:33 PM
---Advertisement---

पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या दोन अनाधिकृत कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय अ संघ जाहिर केला.

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय अ संघ, भारतीय ब संघ, दक्षिण आफ्रिका अ संघ आणि ऑस्ट्रेलिया अ संघ यांच्यात चौरंगी एकदिवसीय मालिका होणार आहे.

या चौरंगी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय अ आणि ब संघाचीसुद्धा घोषणा करण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय अ संघात मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली काम करणाऱ्या युजवेंद्र चहललाही संधी देण्यात आली आहे. या मालिकेत चहलच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष राहणार आहे.

त्याच बरोबर या संघात रणजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रजनिश गुरबानी, नवदीप सैनीलाही संधी देण्यात आली आहे.

ही कसोटी मालिका 4 आॅगस्टपासून सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 4 ते 7 आॅगस्ट दरम्यान तर दुसरा सामना 10 ते 13 आॅगस्ट दरम्यान होणार आहे. हे दोन्ही सामने बेंगलोर येथे पार पडतील.

त्याचबरोबर संजू सॅमसनचीही चौरंगी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय अ संघात निवड झाली आहे. त्याची याआधीही इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अ संघात निवड झाली होती, मात्र तो यो-यो टेस्टमध्ये अपयशी झाल्याने त्याला संघाबाहेर पडावे लागले होते.

पण त्यानंतर त्याने ही फिटनेस टेस्ट यशस्वीरित्या पार करत पुन्हा एकदा भारतीय अ संघात स्थान मिळवले आहे.

दोन्ही मालिकांसाठी भारतीय अ संघाचे नेतृत्व श्रेयश अय्यरकडे तर चौरंगी एकदिवसीय मालिकेतील भारतीय ब संघाचे नेतृत्व मनीष पांडेकडे सोपवण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय अ  संघ-

श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, आर समर्थ, मयांक आगरवाल, एआर इश्वरन, हणुमा विहारी, अंकित बावने, केएस भरत (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, एस नदिम, जयंत यादव, रजनिश गुरबानी, नवदीप सैनी, अंकित राजपूत, मोहम्मद सिराज.

चौरंगी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय अ संघ-

श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, आर समर्थ, सूर्यकुमार यादव, नितीश राणा, सिद्धेश लाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मयांक मार्कंडे, के गौतम, कृणाल पंड्या, दीपक चहर, मोहम्मद सिराज, शिवम मावी, खलील एहमद.

चौरंगी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय ब संघ-

मनीष पांडे (कर्णधार), मयांक आगरवाल,  एआर इश्वरन, शुभमन गिल, दिपक हुड्डा, रिकी भुई, विजय शंकर, इशान किशन  (यष्टीरक्षक), श्रेयस गोपाल, जयंत यादव, डिए जडेजा, सिद्धार्थ कौल, प्रसिध कृष्णा, खुलवंत खजोरीया, नवदीप सैनी.

महत्त्वाच्या बातम्या-

-पाकिस्तानी गोलंदाजाची चालाखी, पहा कसे केले सेलिब्रेशन

-एमएस धोनीची फॅमीली मेंबर करत आहे मुंबई इंडियन्ससाठी चिअर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment