भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी (१ नोव्हेंबर) महिला आयपीएल २०२०च्या टायटल स्पॉन्सरची घोषणा केली. जिओ कंपनीला हे स्पॉन्सरशीप मिळाले आहे. बीसीसीआय आणि जीओ यांच्यात झालेल्या भागीदारीत रिलायन्स फाउंडेशन एँड स्पोर्ट्स फॉर ऑल यांचाही पाठिंबा असेल.
महत्त्वाचे म्हणजे, ही एक ऐतिहासिक भागीदारी ठरली आहे. कारण पहिल्यांदाच कोणत्या प्रायोजकाने (स्पॉन्सर) महिला आयपीएलसाठी बीसीसीआयसोबत करार केला आहे.
सचिव शाह यांचे मत
जीओ कंपनीला महिला आयपीएलचे टायटल स्पॉन्सरशीप मिळाल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी त्यांचे मत मांडले. ते म्हणाले की, “महिला आयपीएलसाठी एक समर्पित मार्ग तयार करणे हेच आमचे एकमेव लक्ष्य आहे. जीओ कंपनीसोबत करार केल्यामुळे बीसीसीआयचे आर्थिक पाठबळ वाढले आहे. आम्हाला विश्वास आहे की, जीओ आणि रिलायन्स फाउंडेशन एँड स्पोर्ट्स फॉर ऑल हे टायटल स्पॉन्सर म्हणून महिला आयपीएलचे मजबूत भागीदार ठरतील.”
सौरव गांगुलीचे वक्तव्य
महिला आयपीएल २०२० विषयी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला की, “बीसीसीआय क्रिकेटच्या सर्व स्वरुपात प्रगती करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. त्यामुळे महिला क्रिकेटच्या प्रसिद्धीत वाढ करण्याचा हा खूप चांगला पर्याय आहे. आम्हाला आशा आहे की, जीओ महिला आयपीएल अधिकाधिक युवा महिला क्रिकेटपटूंना प्रेरित करेल. यामुळे पालकांच्या मनातही विश्वास निर्माण होईल की, क्रिकेटमध्येही आपल्या मुलींची कारकिर्द घडू शकते.”
४ नोव्हेंबरपासून ते ९ नोव्हेंबरपर्यंत युएईतील शारजाह येथे महिला आयपीएल २०२०चे सामने होतील. हे सामने सुपरनोवाज, वेलोसिटी आणि ट्रेलब्लेझर्स संघांत खेळले जातील.
महत्त्वाच्या बातम्या-
मिताली राजच्या संघातील खेळाडूला कोरोनाची लागण; महिला आयपीएलमधील सहभागावर प्रश्नचिन्ह
महिला आयपीएल: बीसीसीआयने घोषित केले वेळापत्रक आणि संघ; पाहा कोणाला मिळाली कर्णधारपदी संधी