---Advertisement---

आयपीएल २०१९: प्लेऑफचे सामने सुरु होणार या नवीन वेळेत

On: सोमवार, एप्रिल 29, 2019 4:34 PM
---Advertisement---

बीसीसीआयने आज(29 एप्रिल) आयपीएल 2019 मधील प्लेऑफच्या सामन्याच्या वेळेची घोषणा केली आहे. 7 मे पासून सुरु होणाऱ्या प्लेऑफमधील सर्व सामन्यांना संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे.

आयपीएल 2019मधील साखळी फेरीतील संध्याकाळचे सामने रात्री 8 वाजता सुरु होतात. परंतू हे सामने रात्री उशीरा संपत असल्याने याबद्दल बऱ्याचदा टीका झाली आहे. तसेच संध्याकाळी दवही पडत असल्याने प्लेऑफमधील सामने अर्धातास लवकर घेण्यात येणार आहेत.

प्लेऑफचे सामने 7 मे पासून चालू होणार आहेत. 7 मेला पहिली क्वालिफायर चेन्नईमध्ये होईल. त्यानंतर 8 मेला होणारा एलिमिनेटरचा सामना आणि 10 मेला होणारा क्वालिफायर 2 चा सामना विशाखापट्टणमला होईल. तसेच अंतिम सामना 12 मेला हैद्राबादला होईल.

याबरोबरच बीसीसीआयने आज 6 मे ते 11 मे दरम्यान होणाऱ्या महिला ट्वेंटी20 चॅलेंज मालिकेतील सामन्यांच्या वेळेचीही घोषणा केली आहे. या महिलांच्या आयपीएल मालिकेत यावर्षी सुपरनोवा आणि ट्रेलब्लेझर्ससह वेलोसिटी हा नवीन संघ सहभागी होणार आहेत. तसेच या मालिकेतील सर्व सामने जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहेत.

या मालिकेतील 6 आणि 9 मेला होणाऱ्या साखळी फेरीतील सामन्यांना आणि 11 मेला होणाऱ्या अंतिम सामन्याला संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल. फक्त 8 मेला होणारा साखळी फेरीतील सामना हा 3.30 वाजता सुरु होईल.

#असे असतील प्लेऑफचे सामने – 

7 मे – क्वालिफायर 1, एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई – संध्या. 7.30 वा.

8 मे – एलिमिनेटर, डॉ. वायएसआर रेड्डी एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम – संध्या. 7.30 वा.

10 मे – क्वालिफायर 2, डॉ. वायएसआर रेड्डी एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम – संध्या. 7.30 वा.

12 मे – अंतिम सामना, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हैद्राबाद – संध्या. 7.30 वा.

#असे होतील महिला ट्वेंटी20 चॅलेंज मालिकेतील सामने – 

6 मे – सुपरनोवा विरुद्ध ट्रेलब्लेझर्स, सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर – संध्या. 7.30 वा.

8 मे – ट्रेलब्लेझर्स विरुद्ध वेलोसिटी, सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर – संध्या. 7.30 वा.

9 मे – सुपरनोवा विरुद्ध वेलोसिटी, सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर – संध्या. 7.30 वा.

11 मे – अंतिम सामना, सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर – संध्या. 7.30 वा.

महत्त्वाच्या बातम्या –

९ वेळा नाणेफक हरल्यानंतर विराटने असे केले सेलिब्रेशन, पहा व्हिडिओ

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला झाला मोठा दंड, जाणून घ्या कारण

बेंगलोरचा पराभव करत ७ वर्षांनंतर दिल्लीने आयपीएलमध्ये केला तो कारनामा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment