---Advertisement---

बेंगलोरचा पराभव करत ७ वर्षांनंतर दिल्लीने आयपीएलमध्ये केला तो कारनामा

On: रविवार, एप्रिल 28, 2019 9:04 PM
---Advertisement---

दिल्ली। आज(28 एप्रिल) फिरोजशहा कोटला स्टेडियमवर आयपीएल 2019 मधील 46 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. या सामन्यात दिल्लीने 16 धावांनी विजय मिळवला. याबरोबर आयपीएल 2019 च्या प्लेऑफमध्ये प्रवेशही निश्चित केला आहे.

आयपीएलच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची दिल्ली संघाची ही चौथी वेळ असून नाव बदलल्यानंतर पहिल्याच मोसमात दिल्लीने हा पराक्रम केला आहे. याआधी दिल्ली डेअरडेविल्स हे नाव असताना दिल्लीने 2008, 2009 आणि 2012 मध्ये आयपीएल प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.

पण 2012 नंतर मात्र दिल्ली संघाची कामगिरी खालवली. त्यामुळे त्यांना पुढील 6 मोसमात प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले. परंतू यावर्षी युवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली त्यांनी आत्तापर्यंत 12 पैकी 8 सामने जिंकून प्लेऑफ 2019मधील स्थान पक्के केले.

दिल्ली हा आयपीएल 2019च्या प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्सच्या संघानेही प्लेऑफचे स्थान पक्के केले आहे. चेन्नईनेही आत्तापर्यंत 12 पैकी 8 सामने जिंकून 16 गुण मिळवले आहेत. पण गुणतालिकेत दिल्लीने नेट रनरेटच्या जोरावर सध्या अव्वल स्थान पटकावले आहे.

आजच्या सामन्यात दिल्लीने शिखर धवन(50) आणि कर्णधार श्रेयस अय्यरने(52) केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 187 धावा केल्या होत्या. त्यानंतर 188 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बेंगलोरला मात्र 20 षटकात 7 बाद 171 धावाच करता आल्या.

Screengrab: http://www.iplt20.com

महत्त्वाच्या बातम्या –

हा चाहता विराटच्या प्रतीक्षेत कोटला वर!!!

स्टिव्ह स्मिथने घेतला डेव्हिड वॉर्नरचा अफलातून झेल, पहा व्हिडिओ

Video: त्या फलंदाजाने एक धाव घेताच संघसहकाऱ्यांनी वाजवल्या टाळ्या, जाणून घ्या कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment