---Advertisement---

अखेर भारतातील सर्वोच्च देशांतर्गत स्पर्धेचा लागला मुहूर्त! रणजी ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर

On: मंगळवार, फेब्रुवारी 1, 2022 5:51 PM
ranji-trophy
---Advertisement---

रणजी ट्राॅफी (ranji trophy) ही देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेतूनच युवा खेळाडू पुढे येत असतात, तसेच ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण करत असतात. बीसीसीआयने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार यावर्षी रणजी ट्राॅफी लीग स्पर्धा १६ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान आयोजित केली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बीसीसीआयला (BCCI) ही सर्वोच्च देशांतर्गत स्पर्धा स्थगित करावी लागली होती. सुरुवातीला ही स्पर्धा १३ जानेवारीला खेळली जाणार होती.

या स्पर्धेत ३८ संघ सहभागी होणार असून ही स्पर्धा अहमदाबाद, कोलकत्ता, त्रिवेंद्रम, कटक, चेन्नई, गुवाहाटी, हैद्राबाद, थिरुवनंतपुरम आणि राजकोट या ९ शहरांत खेळवल्या जातील. या स्पर्धेच्या स्वरुपात बदल करण्यात आले आहेत. या स्पर्धेतील सहभागी ३८ संघांपैकी ४-४ संघांचे ८ गटात विभाजन होणार आहे. तर प्लेट गटात उरलेल्या ६ संघांचा सामावेश करण्यात येणार आहे. मार्च २०२० मध्ये रणजी ट्राॅफीच्या अंतिम सामन्यातनंतर भारतात मर्यादित षटकांच्या प्रकारातील कोणताही राष्ट्रीय स्तरावरील देशांतर्गत सामना पार पडलेला नाही.

रणजी ट्राॅफीच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धा दोन टप्प्यांत आयोजित करण्यात आली आहे. आयपीएलचा १५ वा हंगाम मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होत आहे. त्यामुळे आयपीएल संपल्यानंतर जूनमध्ये रणजी ट्राॅफीचे उरलेले सामने खेळवले जाणार आहेत. मागच्या मोसमात कोरोनामुळे रणजी ट्राॅफी स्पर्धा रद्द करण्यात आली होती.

हेही वाचा- वेळेअभावी सलग दुसऱ्या वर्षी रणजी ट्रॉफी होणार रद्द? वाचा सविस्तर

बीसीसीआयचे सचिव जय शहा म्हणाले की, “रणजी स्पर्धेचे पुनरागमन झाल्यामुळे देशातील असंख्य क्रिकेटपटूंना दिलासा मिळेल, याची मला खात्री आहे. देशभरातील कोरोनाचा आढावा घेऊन आम्ही या ९ शहरांची निवड केली असून खेळाडूंच्या आरोग्य सुरक्षेला आमचे प्राधान्य असणार आहे. जूनमध्ये स्पर्धेतील बाद फेरीचे सामने खेळवले जातील. या सामन्यांच्या ठिकाणांबाबतचा निर्णय पुढील काही महिन्यांत घेतला जाईल.”

रणजी ट्रॉफी स्पर्धा ही भारतातील सर्वात जुनी क्रिकेट स्पर्धा असुन ती सर्वप्रथम १९३४ साली क्रिकेटर रणजित सिंग यांच्या नावे ही स्पर्धा खेळली गेली. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात मुंबईने सर्वाधिक ४१ वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर वसीम जाफर यांनी सर्वाधिक १० हजार ७३८ धावा केलेल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

बाप-लेक आखाड्यात आमने-सामने! ‘ट्रिपल महाराष्ट्र केसरी’ विजय चौधरींचा वडिलांबरोबर कुस्ती खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल

ऐतिहासिक वनडे सामन्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये ‘नो एन्ट्री’, मग टी२० मालिकेसाठी तरी परवानगी आहे का?

तब्बल १४ हंगामात खोऱ्याने पैसा ओढला, १५व्या मोसमातही नोंदवलंय नाव! तो एकलाची एक ‘असा’ परदेशी खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---