इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम आता अंतिम टप्यात आला असून १५ ऑक्टोबरला या हंगामाचा अंतिम सामना होणार आहे. असे असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलच्या २०२२ हंगामाची तयारी सुरु केली आहे. काही महिन्यांपूर्वीच बीसीसीआयने जाहीर केले होते की पुढीलवर्षी आयपीएलमध्ये २ नवे संघ सामील होणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षी ८ ऐवजी १० संघ खेळताना दिसतील. आता बीसीसीआयने या २ नव्या संघांच्या निविदेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
बीसीसीआयने बुधवारी (१३ ऑक्टोबर) ‘निविदा आमंत्रण’ खरेदी करण्याची तारिख वाढल्याचे सांगितले आहे. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने ३१ ऑगस्ट २०२१ रोजी नॉन-रिफंडेबल निविदा शुल्क भरल्यावर उपलब्ध होणाऱ्या ‘निविदा आमंत्रण’ (ITT) दस्तऐवज जारी केले होते. त्यानंतर बीसीसीआयने ‘निविदा आमंत्रण’ खरेदी करण्याची मुदत ५ ऑक्टोबर २०२१ ऐवजी १० ऑक्टोबर २०२१ पर्यंत वाढवली होती.
पण, आता निविदा आमंत्रण खरेदी करण्याच्या विविध इच्छुक उमेदवारांच्या विनंतीनुसार बीसीसीआयने पुन्हा एकदा ‘निविदा आमंत्रण’ खरेदी करण्याची मुदत २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
‘निविदा आमंत्रण’ नॉन-रिफंडेबल निविदा शुल्क मिळाल्यावर उपलब्ध केले जातील. नॉन-रिफंडेबल शुल्क १० लाख रुपये इतके आहे. तसेच यात वस्तू आणि सेवा कराचाही समावेश आहे. याशिवाय अन्य अटीही लागू होतील. या अटींमध्ये पात्रता सिद्ध करणे, बोली सादर करण्याची प्रक्रिया, प्रस्तावित नवीन संघांचे अधिकार आणि दायित्वे इत्यादी ‘निविदा आमंत्रण’मध्ये समाविष्ट आहे
इच्छुक उमेदवारांनी ‘निविदा आमंत्रण’ खरेदी करण्यासाठी बीसीसीआयने मेल करण्यास सांगितले आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार बोली सादर करू इच्छिणाऱ्या कोणत्याही इच्छुक उमेदवारास ‘निविदा आमंत्रण’ खरेदी करणे आवश्यक आहे. तसेच ‘निविदा आमंत्रण’मध्ये निर्धारित केलेले पात्रता निकष पूर्ण करणारे आणि त्यामध्ये निर्धारित केलेल्या इतर अटींची पात्रता पूर्ण करणारेच बोली लावण्यास पात्र असतील.
याबरोबरच बीसीसीआयने हे देखील स्पष्ट केले आहे की केवळ ही ‘निविदा आमंत्रण’ खरेदी केल्याने कोणालाही बोली लावण्याचा अधिकार मिळत नाही. याबरोबरच या प्रक्रियेतील सर्व आधिकार बीसीसीआयकडे असतील.
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल ३ वेळा ‘या’ दिग्गजाने भारताच्या प्रशिक्षकपदासाठी केलाय अर्ज, यंदाही दाखवलीय उत्सुकता; पण…
टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची नवीकोरी जर्सी लाँच, जुन्या जर्सीपेक्षा ‘अशी’ आहे वेगळी
दिल्ली वि. कोलकाता दुसऱ्या क्वालिफायरसाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!