बुधवार (१३ ऑक्टोबर) रोजी इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा क्वालिफायर सामना रंगणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हा सामना होणार आहे. शारजाहच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यात विजयी होणारा संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल. येथे त्यांचा सामना ३ वेळचा आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्ज यांच्याशी होईल.
नुकत्याच एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा ४ विकेट्सने पराभव करत कोलकाताने दुसऱ्या क्वालिफायर सामन्याचे तिकीट मिळवले आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असावा. अशात दुसरा क्वालिफायरही जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचा त्यांचा हेतू असेल. तर पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झाल्यानंतर हा सामना खिशात घालत दमदार पुनरागमन करण्यावर दिल्लीची नजर असेल. त्यामुळे या सामन्यात दोन्हीही संघ तगड्या प्लेइंग इलेव्हनसह उतरतील.
तत्पूर्वी आम्ही तुमच्यासाठी या सामन्यासाठीचा सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंचा अंदाज घेऊन आलो आहोत. चला तर पाहूया, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्यासाठीचा ड्रीम इलेव्हन संघ कसा असेल?
सामन्याबद्दल अधिक माहिती
सामना – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुसरा क्वालिफायर
दिनांक – १३ ऑक्टोबर, संध्याकाळी ७:३० वाजता
ठिकाण – शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
यातून निवडले जातील अंतिम ११ खेळाडू-
कोलकाता नाईट रायडर्स: इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, गुरकीरत सिंग मान, करुण नायर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, लॉकी फर्ग्युसन, पवन नेगी, प्रणम कृष्णा, संदीप वॉरियर, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, बेन कटिंग, शाकिब अल हसन, सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, शिवम मावी, टीम साउथी, शेल्डन जॅक्सन, टीम सेफर्ट, शुभमन गिल, हरभजन सिंग, कमलेश नगरकोटी, कुलदीप यादव.
दिल्ली कॅपिटल्स: शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (कर्णधार), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, अमित मिश्रा, इशांत शर्मा, आर अश्विन, ललित यादव, हर्षल पटेल, आवेश खान, प्रवीण दुबे, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्किया , मार्कस स्टोइनिस, शिमरोन हेटमायर, ख्रिस वोक्स, डॅनियल सॅम, स्टीव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णू विनोद, लुकमन हुसेन मरीयेवाला, एम सिद्धार्थ, टॉम करन, सॅम बिलिंग्स.
हे ११ खेळाडू असतील ड्रीम इलेव्हन संघात-
कर्णधार/यष्टीरक्षक: रिषभ पंत
उपकर्णधार: व्यंकटेश अय्यर
फलंदाज: पृथ्वी शॉ, शिखर धवन, शुभमन गिल
अष्टपैलू: सुनील नारायण, अक्षर पटेल
गोलंदाज: लॉकी फर्ग्युसन, एन्रिच नॉर्किए, आवेश खान, वरुण चक्रवर्ती
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिकच्या फिटनेसबाबत अजूनही शंका, टी२० विश्वचषकासाठी बीसीसीआयची ‘या’ धाकड अष्टपैलूवर नजर
‘मला तुझा अभिमानच आहे’, कर्णधार म्हणून अंतिम सामन्यातही फेल झालेल्या कोहलीचे बहिणीने वाढवलं मनोबल
DCच्या ‘या’ गोलंदाजाची लॉटरी, आयपीएलमधील प्रदर्शनामुळे भारताच्या टी२० विश्वचषक संघात लागणार वर्णी!