क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. सर्वात मोठे क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीसीसीआयने इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या प्लेऑफ आणि महिला टी२० चॅलेंज २०२२च्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी ठिकाणांबद्दलही माहिती दिली आहेत.
आयपीएल २०२२मधील प्लेऑफ सामने (IPL 2022 Playoff Matches) कोलकाता (Kolkata) आणि अहमदाबाद (Ahmedabad) येथे खेळले जाणार आहेत. सामन्यांबद्दल बोलायचं झालं, तर प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर सामना आणि एलिमिनेटर सामना कोलकाता येथे खेळवला जाईल. तसेच, दुसरा क्वालिफायर आणि आयपीएल २०२२चा अंतिम सामना अहमदाबाद येथे खेळला जाईल. दुसरीकडे, महिला टी२० चॅलेंज २०२२ची (Womens T20 Challenge 2022) सुरुवात येत्या २३ मेपासून पुण्यात होणार आहे.
NEWS 🚨 – BCCI announces schedule and venue details for #TATAIPL Playoffs and Women’s T20 Challenge 2022.
More details ⬇️https://t.co/dZkzVs2NGj
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2022
बीसीसीआयकडून (BCCI) जाहीर केलेल्या निवेदनात सांगितले गेले आहे की, २४ मे रोजी क्वालिफायर १ कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडिअममध्ये आयपीएल २०२२मधील गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी असणाऱ्या संघांमध्ये खेळला जाईल. दुसरीकडे, २५ मे रोजी कोलकातामध्येच एलिमिनेटर सामन्याचे आयोजन होईल. गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी असलेल्या संघामध्ये हा सामना खेळवला जाईल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यानंतर आयपीएल २०२२मधील क्वालिफायर २ सामना एलिमिनेटरमधील विजेता आणि क्वालिफायर १चा उपविजेत्या संघात २७ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होईल. दुसरीकडे, आयपीएल २०२२चा अंतिम सामना क्वालिफायर १चा विजेता आणि क्वालिफायर २च्या विजेत्या संघात खेळला जाईल. हे सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता सुरू होतील, तर नाणेफेक ७ वाजता होईल.
बीसीसीआयने जाहीर केलेल्या या वेळापत्रकामुळे आयपीएल चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच, यंदाच्या हंगामात आयपीएलला नवीन विजेता मिळतो का, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. आयपीएल २०२२मध्ये ४७ सामने पार पडल्यानंतर गुणतालिकेत गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ टॉप ४मध्ये आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राजस्थानविरुद्धच्या खेळीमुळे चर्चेत आलेल्या रिंकू सिंगला एकवेळ बीसीसीआयने केले होते बॅन, वाचा किस्सा
हार्दिक पंड्याच्या मुलाला कडेवर घेऊन राशिद खानने लावले ठुमके; पाहून तुमचेही थिरकतील पाय