भारतीय संंघ सध्या बांगलादेशमध्ये वनडे आणि कसोटी मालिका खेळत आहे. भारताने वनडे मालिका गमावली आहे आणि कसोटी मालिकेला लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र, अशातच क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ पुढील वर्षात खूपच व्यस्त असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने भारतातच होणाऱ्या सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. पुढील 3 महिने भारतात सामने खेळण्यासाठी तीन देशांचे संघ येणार आहेत. मार्च महिन्यापर्यंत सातत्याने सामने खेळले जाणार आहेत.
गुरुवारी (दि. 08 डिसेंबर) बीसीसीआयने (BCCI) मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने घोषणा करत श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक (home series against Sri Lanka, New Zealand and Australia) जाहीर केले आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड संघ जानेवारीत भारताचा दौरा करणार आहेत, तर ऑस्ट्रेलिया संघ फेब्रुवारी आणि मार्चमध्ये भारतात असेल.
🚨 NEWS 🚨: BCCI announces schedule for Mastercard home series against Sri Lanka, New Zealand & Australia. #TeamIndia | #INDvSL | #INDvNZ | #INDvAUS | @mastercardindia
More Details 🔽https://t.co/gEpahJztn5
— BCCI (@BCCI) December 8, 2022
श्रीलंका संघाला भारतात 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. तसेच, न्यूझीलंडही 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा दौरा मोठा असणार आहे. कारण, यामध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील 4 कसोटी सामने खेळले जाणार आहेत.
असे आहे तिन्ही संघांचे संपूर्ण वेळापत्रक
श्रीलंका संघाचा भारत दौरा 2022
पहिला टी20- 3 जानेवारी (मुंबई)
दुसरा टी20- 5 जानेवारी (पुणे)
तिसरा टी20- 7 जानेवारी (राजकोट)
पहिला वनडे- 10 जानेवारी (गुवाहाटी)
दुसरा वनडे- 12 जानेवारी (कोलकाता)
तिसरा वनडे- 15 जानेवारी (तिरुवनंतपुरम)
न्यूझीलंडचा भारत दौरा 2023
पहिला वनडे- 18 जानेवारी (हैदराबाद)
दूसरा वनडे- 21 जानेवारी (रायपूर)
तीसरा वनडे- 24 जानेवारी (इंदोर)
पहिला टी20- 27 जानेवारी (रांची)
दुसरा टी20- 29 जानेवारी (लखनऊ)
तिसरा टी20- 1 फेब्रुवारी (अहमदाबाद)
ऑस्ट्रेलिया का भारत दौरा 2023
पहिला टेस्ट- 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी (नागपूर)
दुसरा टेस्ट- 17 ते 21 फेब्रुवारी (दिल्ली)
तिसरा टेस्ट- 1 ते 5 मार्च (धर्मशाला)
चौथा टेस्ट- 9 ते 13 मार्च (अहमदाबाद)
पहिला वनडे- 17 मार्च (मुंबई)
दुसरा वनडे- 19 मार्च (विशाखापट्टणम)
तिसरा वनडे- 22 मार्च (चेन्नई)
खरं तर, सन 2023मध्ये वनडे विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघ सातत्याने क्रिकेट खेळत आहे. बीसीसीआयनेही आता तीन महिन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. तसेच, मार्च- एप्रिलमध्ये आयपीएलही होणार आहे. अशात सन 2023मध्ये चाहत्यांना क्रिकेटचा भरपूर आनंद लुटता येणार आहे. (BCCI announces schedule for home series against Sri Lanka, New Zealand and Australia this 3 team read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘…म्हणून आम्ही भारताला हरवू शकलो’, बांगलादेशच्या शतकवीराचा मोठा खुलासा
सलामीला खेळवा, नाहीतर तळात; शर्माजींचा पोरगा सगळीकडेच ठरतोय ‘हिटमॅन’, नुसता पाडलाय षटकारांचा पाऊस