---Advertisement---

आयपीएल २०२०च्या फायनलची तारिख आणि ठिकाण ठरले! असे आहे संपूर्ण वेळापत्रक

On: मंगळवार, फेब्रुवारी 18, 2020 7:20 PM
---Advertisement---

आयपीएल 2020च्या (IPL 2020) 13 व्या हंगामाला (IPL 13th Season) 29 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्यासाठी आयपीएल 2020च्या साखळी सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक बीसीसीआयने अधिकृतरित्या आज जाहीर केले आहे.

या मोसमातील आयपीएलचा पहिला सामना 29 मार्चला वानखेडे स्टेडियम येथे गतविजेत्या मुंबई इंडियन्स  विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) संघात होणार आहे.

https://twitter.com/IPL/status/1229649790566162433

त्याचबरोबर या हंगामातील अंतिम सामना 24 मे रोजी मुंबईत खेळण्यात येईल. अंतिम सामन्याची तारिख आणि ठिकाण ठरले असले तरी अजून प्ले ऑफच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही.

आयपीएलच्या या मोसमात केवळ रविवारी डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) सामने होणार आहेत. त्यामुळे या मोसमात केवळ 6 डबल हेडर असणार आहेत. डबल हेडरच्या दिवशी दुपारचे सामने 4 वाजता सुरु होतील आणि संध्याकाळचे सामने 8 वाजता सुरु होतील. तसेच आयपीएलचा हा 13 वा मोसम यावर्षी 57 दिवसांचा असणार आहे.

आयपीएलच्याआधी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. ही वनडे मालिका 18 मार्चला कोलकाता येथे संपेल. त्यानंतर 11 दिवसांनी आयपीएलला सुरुवात होईल.

आयपीएल 2020च्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक-

29 मार्च, रविवार: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – मुंबई, रात्री 8 वाजता

30 मार्च, सोमवार: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब – दिल्ली, रात्री 8 वाजता

31 मार्च, मंगळवार: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – बंगळुरु, रात्री 8 वाजता

1 एप्रिल, बुधवार: सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स – हैद्राबाद, रात्री 8 वाजता

2 एप्रिल, गुरुवार: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – चेन्नई, रात्री 8 वाजता

3 एप्रिल, शुक्रवार: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – कोलकाता, रात्री 8 वाजता

4 एप्रिल, शनिवार: किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद – मोहाली, रात्री 8 वाजता

5 एप्रिल, रविवार: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – मुंबई, दुुपारी 4 वाजता

5 एप्रिल, रविवार: राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – जयपूर/गुवाहाटी, रात्री 8 वाजता

6 एप्रिल, सोमवार: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – कोलकाता, रात्री 8 वाजता

7 एप्रिल, मंगळवार: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद – बंगळुरु, रात्री 8 वाजता

8 एप्रिल, बुधवार: किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स – मोहाली, रात्री 8 वाजता

9 एप्रिल, गुरुवार: राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – जयपूर/गुवाहाटी, रात्री 8 वाजता

10 एप्रिल, शुक्रवार: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर –  दिल्ली – रात्री 8 वाजता

11 एप्रिल, शनिवार: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब – चेन्नई, रात्री 8 वाजता

12 एप्रिल, रविवार: सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स – हैद्राबाद, दुपारी 4 वाजता

12 एप्रिल, रविवार: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – कोलकाता, रात्री 8 वाजता

13 एप्रिल, सोमवार: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – दिल्ली, रात्री 8 वाजता

14 एप्रिल, मंगळवार: किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – मोहाली, रात्री 8 वाजता

15 एप्रिल, बुधवार: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – मुंबई – रात्री 8 वाजता

16 एप्रिल, गुरुवार: सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – हैद्राबाद, रात्री 8 वाजता

17 एप्रिल, शुक्रवार: किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – मोहाली, रात्री 8 वाजता

18 एप्रिल, शनिवार: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स – बंगळुरु, रात्री 8 वाजता

19 एप्रिल, रविवार: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स – दिल्ली, दुपारी 4 वाजता

19 एप्रिल, रविवारः चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – चेन्नई, रात्री 8 वाजता

20 एप्रिल, सोमवार: मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब – मुंबई, रात्री 8 वाजता

21 एप्रिल, मंगळवार: राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद – जयपूर, रात्री 8 वाजता

22 एप्रिल, बुधवार: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – बंगळुरु, रात्री 8 वाजता

23 एप्रिल, गुरुवार: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब – कोलकाता, रात्री 8 वाजता

24 एप्रिल, शुक्रवार: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स – चेन्नई,रात्री 8 वाजता

25 एप्रिल, शनिवारः राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – जयपूर, रात्री 8 वाजता

26 एप्रिल, रविवार: किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – मोहाली, दुपारी 4 वाजता

26 एप्रिल, रविवार: सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – हैदराबाद, रात्री 8 वाजता

27 एप्रिल, सोमवारः चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – चेन्नई, रात्री 8 वाजता

28 एप्रिल, मंगळवार: मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – मुंबई, रात्री 8 वाजता

29 एप्रिल, बुधवार: राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब – जयपूर,रात्री 8 वाजता

30 एप्रिल, गुरुवार: सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – हैद्राबाद, रात्री 8 वाजता

1 मे, शुक्रवार: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – मुंबई, रात्री 8 वाजता

2 मे, शनिवार: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – कोलकाता,रात्री 8 वाजता

3 मे, रविवार: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब – बेंगळुरू, दुपारी 4 वाजता 

3 मे, रविवारः दिल्लीची कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – दिल्ली, रात्री 8 वाजता

4 मे , सोमवारः राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – जयपुर, रात्री 8 वाजता

5 मे, मंगळवार: सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – हैद्राबाद, रात्री 8 वाजता

6 मे, बुधवार: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – दिल्ली, रात्री 8 वाजता

7 मे, गुरुवार: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – चेन्नई, रात्री 8 वाजता

8 मे, शुक्रवार: किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स – मोहाली, रात्री 8 वाजता

9 मे, शनिवारः मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद – मुंबई, रात्री 8 वाजता

10 मे, रविवारः चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – चेन्नई, दुपारी 4 वाजता

10 मे, रविवार: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – कोलकाता, रात्री 8 वाजता 

11 मे, सोमवारः राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – जयपूर, रात्री 8 वाजता

12 मे, मंगळवार: सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब – हैद्राबाद, रात्री 8 वाजता

13 मे, बुधवार: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – दिल्ली, रात्री 8 वाजता

14 मे, गुरुवार: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – बेंगळुरू, रात्री 8 वाजता

15 मे, शुक्रवार: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद – कोलकाता, रात्री 8 वाजता

16 मे, शनिवारः किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – मोहाली, रात्री 8 वाजता

17 मे, रविवारः रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स – बेंगळुरू, रात्री 8 वाजता

https://twitter.com/Maha_Sports/status/1229734122895089666

https://twitter.com/Maha_Sports/status/1229732964415811584

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---