---Advertisement---

मुंबई विरुद्ध बेंगलोर सामन्याने होणार आयपीएल २०२१ ची सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगचा चौदावा हंगाम उद्यापासून (९ एप्रिल) सुरु होत आहे. त्यामुळे आता चौदाव्या हंगामाची प्रतिक्षा संपुष्टात आली असून भारतभरात आयपीएलचे वारे वाहू लागले आहेत. याहंगामाचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे. तर अंतिम सामना ३० मे रोजी अहमदाबाद येथे होईल.

दरम्यान, हंगामातील साखळी फेरीचे सामने अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे खेळवण्यात येतील. तर अमदाबादच्या पुनर्बांधणी केलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच प्लेऑफचे सर्व सामने खेळवले जातील.

या हंगामात साखळी फेरीत एकूण ५६ सामने होतील. त्यातील सर्वाधिक १० सामन्यांचे यजमानपद चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरू या शहरांना देण्यात आले आहे. अहमदाबाद आणि दिल्ली येथे प्रत्येकी ८ सामने होती. अशाप्रकारे प्रत्येक संघाला एकूण ६ ठिकाणांपैकी चार वेगवेगळ्या ठिकाणी साखळी फेरीचे सामने खेळण्याची संधी मिळेल. तसेच या हंगात कोणताही संघ घरच्या मैदानावर सामने खेळणार नाही. सर्व संघ तटस्थ ठिकाणांवर सामने खेळतील.

साखळी फेरीत ११ डबल हेडर (एका दिवशी २ सामने) असतील, ज्यामध्ये ६ संघ दुपारचे ३ सामने खेळतील आणि २ संघ दुपारचे अवघे २ सामने खेळतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारचे सामने ३.३० वाजता सुरू होतील. तर संध्याकाळचे सामने ७.३० वाजता सुरु होतील.

https://twitter.com/IPL/status/1368470902636126209?s=20

 

या हंगामाचे वेळापत्रक असे तयार केले आहे की साखळी फेरी दरम्यान संघांना केवळ ३ वेळा प्रवास करता येईल, ज्यामुळे प्रवास कमी होईल आणि जोखीमही कमी होईल. याबरोबरच या हंगामातील पहिला टप्प्यात प्रेक्षकांविना सामने खेळवले जातील. त्यानंतर पुढच्या टप्प्यात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश द्यायचा की नाही याबद्दल निर्णय घेतला जाईल.

असे आहे आयपीएल २०२१ चे वेळापत्रक –

साखळी फेरी

९ एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, चेन्नई, ७.३० वाजता
१० एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई, ७.३० वाजता
११ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई, ७.३० वाजता
१२ एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स, मुंबई, ७.३० वाजता
१३ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स , चेन्नई, ७.३० वाजता
१४ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, चेन्नई, ७.३० वाजता
१५ एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई, ७.३० वाजता
१६ एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, मुंबई, ७.३० वाजता
१७ एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई, ७.३० वाजता
१८ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई, ३.३० वाजता
१८ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स, मुंबई, ७.३० वाजता
१९ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, मुंबई, ७.३० वाजता
२० एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स , चेन्नई, ७.३० वाजता
२१ एप्रिल -पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई, ३.३० वाजता
२१ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, मुंबई, ७.३० वाजता
२२ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स, मुंबई, ७.३० वाजता
२३ एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, चेन्नई, ७.३० वाजता
२४ एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई, ७.३० वाजता
२५ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई, ३.३० वाजता
२५ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई, ७.३० वाजता
२६ एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, अहमदाबाद, ७३० वाजता
२७ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, अहमदाबाद, ७.३० वाजता
२८ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली, ७.३० वाजता
२९ एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दिल्ली, ७.३० वाजता
२९ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, अहमदाबाद, ७.३० वाजता
३० एप्रिल – पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, अहमदाबाद, ७.३० वाजता

१ मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली, ७.३० वाजता
२ मे – पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, अहमदाबाद, ७.३० वाजता
३ मे – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, अहमदाबाद, ७.३० वाजता
४ मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, दिल्ली, ७.३० वाजता
५ मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली, ७.३० वाजता
६ मे – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स, अहमदाबाद, ७.३० वाजता
७ मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली, ७.३० वाजता
८ मे – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, अहमदाबाद, ३.३० वाजता
८ मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दिल्ली, ७.३० वाजता
९ मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स, बेंगळुरु, ३.३० वाजता
९ मे – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता, ७.३० वाजता
१० मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, बंगळुरू, ७.३० वाजता
११ मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोलकाता, ७.३० वाजता
१२ मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, बंगळुरु, ७.३० वाजता
१३ मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स, बंगळुरु, ३.३० वाजता
१३ मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोलकाता, ७.३० वाजता
१४ मे – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता, ७.३० वाजता
१५ मे – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स, बंगळुरु, ७.३० वाजता
१६ मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, कोलकाता, ३.३० वाजता
१६ मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, बंगळुरु, ७.३० वाजता
१७ मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता, ७.३० वाजता
१८ मे – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, बंगळुरु, ७.३० वाजता
१९ मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स, बंगळुरु, ७.३० वाजता
२० मे – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स, कोलकाता, ७.३० वाजता
२१ मे – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, बंगळुरु, ३.३० वाजता
२१ मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता, ७.३० वाजता
२२ मे – पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, बंगळुरु, ७.३० वाजता
२३ मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता, ३.३० वाजता
२३ मे – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता, ७.३० वाजता

प्लेऑफ – 

२५ मे – क्वालिफायर १, अहमदाबाद, ७.३० वाजता
२६ मे – एलिमिनेटर, अहमदाबाद, ७.३० वाजता
२८ मे – क्वालिफायर २ , अहमदाबाद, ७.३० वाजता
३० मे – अंतिम सामना, अहमदाबाद, ७.३० वाजता

महत्त्वाच्या बातम्या –

यंदा आरसीबीला मिळणार का विजेतेपद? चाहत्याच्या प्रश्नाला मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचे भन्नाट उत्तर

धोनी मैदानात ‘कॅप्टनकुल’ तर मैदानाबाहेर करणार ‘हेरगिरी’; वाचा काय आहे प्रकरण

‘वेगाचा बादशहा’ उसेन बोल्टलाही लागले आयपीएलचे वेध! आरसीबीच्या जर्सीतील फोटो शेअर करत दिला ‘हा’ संदेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---