इंडियन प्रीमियर लीगचा थरार सुरू होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. उद्यापासून (९ एप्रिल) आयपीएल २०२१ स्पर्धा सुरू होणार आहे. तसेच या स्पर्धेतील पहिली लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार आहे. या सामन्यानंतर दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमने सामने असणार आहेत. या सामन्यात एमएस धोनी पुन्हा एकदा चाहत्यांना मैदानावर पाहाता येणार आहे. दरम्यान, आणखी एका गोष्टीसाठी सध्या तो चर्चेत आहे.
नुकताच एमएस धोनी आणि साक्षी सिंग धोनीने आपले प्रोडक्शन हाऊस, धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि ब्लॅक-व्हाईट ऑरेंज सोबत मिळून एक प्रोजेक्ट हाती घेतला आहे. याबाबतची माहिती धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ७ एप्रिल रोजी देण्यात आली आहे.
एमएस धोनी क्रिकेटसह आता चित्रपटनिर्मिती क्षेत्रात देखील आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या २०२२ मध्ये धोनीची नवीन वेब सीरिज ‘ कॅप्टन ७ ‘ रिलीज होणार आहे. ही वेब सीरिज एक ॲनिमेटेड सिरीज असणार आहे. ही सीरिज धोनीच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. या मालिकेचे वर्णन देशातील पहिला “अॅनिमेटेड हेरगिरी” शो म्हणून केले जात आहे.
'Captain 7' – the beginning of India’s first animated spy universe based on MS Dhoni’s attributes, from the house of Dhoni Entertainment and Black White Orange..7️⃣
We can already feel the action! ????@msdhoni @SaakshiSRawat pic.twitter.com/04v4SqsVmT— Dhoni Entertainment Pvt Ltd (@DhoniLtd) April 7, 2021
या सीरिजबद्दल बोलताना धोनी म्हणाला, “वेब सीरिजची संकल्पना आणि कथा उत्कृष्ट आहेत. क्रिकेटशिवाय हे माझे इतर आवडीदेखील बाहेर आणेल.” तसेच साक्षीने देखील या वेब सीरिजबद्दल मत मांडले. ती म्हणाली,” जेव्हा बीडब्ल्यूओने माहीवर आधारित अॅनिमेशन फिक्शन शोची संकल्पना आणली तेव्हा, आम्ही बोर्डवर होतो. तेव्हा ते म्हणाले की, कॅप्टन ७ मध्ये तुम्हाला भरपूर रोमांच पाहायला मिळेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
‘वेगाचा बादशहा’ उसेन बोल्टलाही लागले आयपीएलचे वेध! आरसीबीच्या जर्सीतील फोटो शेअर करत दिला ‘हा’ संदेश
आयपीएल २०२१: ‘ऑरेंज आर्मी’ची पहिली भिडंत केकेआरविरुद्ध, पाहा त्यांचे संपूर्ण वेळापत्रक
बापरे! वयाच्या १३ व्या वर्षी मोईन अलीला जीवे मारण्याचा झाला होता प्रयत्न? वाचा काय आहे कहाणी