---Advertisement---

मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याने होणार आयपीएल २०२१ च्या युएई टप्प्याचा श्रीगणेशा, पाहा संपूर्ण वेळापत्रक

On: शनिवार, सप्टेंबर 18, 2021 11:02 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ चा उर्वरित हंगाम १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे पार पडणार आहे. बीसीसीआयने उर्वरित आयपीएल २०२१ चे वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जाहीर केले असून १९ सप्टेंबरला आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात दुबई येथे पार पडणार आहे.

आयपीएल २०२१ हंगामाचा पहिला टप्पा एप्रिल-मे दरम्यान भारतात पार पडला होता. त्यावेळी २९ सामन्यांनतर कोरोनाच्या संकटामुळे हा हंगाम स्थगित करावा लागला होता. आता या हंगामातील दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ३१ सामने युएईतील दुबई, शारजाह आणि अबुधाबी या ३ शहरात एकूण २७ दिवसात खेळवण्यात येतील.

एकूण ३१ सामन्यांपैकी १३ सामने दुबईत, १० सामने शारजाहमध्ये आणि ८ सामने अबुधाबीमध्ये पार पडतील. तसेच ७ डबल हेडर (एकाच दिवशी २ सामने) असतील. डबल हेडरमध्ये पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरु होईल. दुसरा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल.

या हंगामातील साखळी फेरीचे सामने ८ ऑक्टोबर रोजी संपतील. त्यानंतर १० ऑक्टोबरपासून प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होईल. १० ऑक्टोबरला दुबईत पहिला क्लालिफायर सामना होईल. त्यानंतर ११ आणि १३ ऑक्टोबरला अनुक्रमे एलिमिनेटर आणि दुसरा क्वालिफायर सामना शारजाह येथे होईल. त्यानंतर १५ ऑक्टोबरला दुबईल अंतिम सामना रंगेल. (BCCI announces schedule for remainder of IPL 2021)

असे आहे उर्वरित आयपीएल २०२१ हंगामाचे वेळापत्रक (वेळ – भारतीय प्रमाणवेळेनुसार)

साखळी फेरी
१९ सप्टेंबर – चेन्नई विरुद्ध मुंबई, दुबई, संध्या. ७.३० वाजता
२० सप्टेंबर – कोलकाता विरुद्ध बेंगलोर, अबुधाबी, संध्या. ७.३० वाजता
२१ सप्टेंबर – पंजाब विरुद्ध राजस्थान, दुबई, संध्या. ७.३० वाजता
२२ सप्टेंबर – दिल्ली विरुद्ध हैदराबाद, दुबई, संध्या. ७.३० वाजता
२३ सप्टेंबर – मुंबई विरुद्ध कोलकाता, अबुधाबी, संध्या. ७.३० वाजता
२४ सप्टेंबर – बेंगलोर विरुद्ध चेन्नई, शारजाह, संध्या. ७.३० वाजता
२५ सप्टेंबर – दिल्ली विरुद्ध राजस्थान, अबुधाबी, दु. ३.३० वाजता
२५ सप्टेंबर – हैदराबाद विरुद्ध पंजाब, शारजा, संध्या. ७.३० वाजता
२६ सप्टेंबर – चेन्नई विरुद्ध कोलकाता, अबुधाबी, दु. ३.३० वाजता
२६ सप्टेंबर – बेंगलोर विरुद्ध मुंबई, दुबई, संध्या. ७.३० वाजता
२७ सप्टेंबर – हैदराबाद विरुद्ध राजस्थान, दुबई, संध्या. ७.३० वाजता
२८ सप्टेंबर – कोलकाता विरुद्ध दिल्ली, शारजाह, दु. ३.३० वाजता
२८ सप्टेंबर – मुंबई विरुद्ध पंजाब, अबुधाबी, संध्या. ७.३० वाजता
२९ सप्टेंबर – राजस्थान विरुद्ध बेंगलोर, दुबई, संध्या.७.३० वाजता
३० सप्टेंबर – हैदराबाद विरुद्ध चेन्नई, शारजाह, संध्या. ७.३० वाजता
१ ऑक्टोबर – कोलकाता विरुद्ध पंजाब, दुबई, संध्या. ७.३० वाजता
२ ऑक्टोबर – मुंबई विरुद्ध दिल्ली, शारजाह, दु. ३.३० वाजता
२ ऑक्टोबर – राजस्थान विरुद्ध चेन्नई, अबुधाबी, संध्या. ७.३० वाजता
३ ऑक्टोबर – बेंगलोर विरुद्ध पंजाब, शारजाह, दु. ३.३० वाजता
३ ऑक्टोबर – कोलकाता विरुद्ध हैदराबाद, दुबई, संध्या. ७.३० वाजता
४ ऑक्टोबर – दिल्ली विरुद्ध चेन्नई, दुबई, संध्या. ७.३० वाजता
५ ऑक्टोबर – राजस्थान विरुद्ध मुंबई, शारजाह, संध्या. ७.३० वाजता
६ ऑक्टोबर – बेंगलोरविरुद्ध हैदराबाद, अबुधाबी, संध्या. ७.३० वाजता
७ ऑक्टोबर – चेन्नई विरुद्ध पंजाब, दुबई, दु. ३.३० वाजता
७ ऑक्टोबर – कोलकाता विरुद्ध राजस्थान, शारजाह, संध्या. ७.३० वाजता
८ ऑक्टोबर – हैदराबाद विरुद्ध मुंबई, अबुधाबी, दु. ३.३० वाजता
८ ऑक्टोबर – बेंगलोर विरुद्ध दिल्ली, दुबई, संध्या. ७.३० वाजता

प्लेऑफ सामने
१० ऑक्टोबर – क्वालिफायर १, दुबई, संध्या. ७.३० वाजता
११ ऑक्टोबर – एलिमिनेटर, शारजाह, संध्या. ७.३० वाजता
१३ ऑक्टोबर – क्वालिफायर २, शारजाह, संध्या. ७.३० वाजता
१५ ऑक्टोबर – अंतिम सामना, दुबई, संध्या. ७.३० वाजता

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल २०२१: ‘या’ दिवशी रंगणार मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा महामुकाबला

पोलार्डच्या ‘त्या’ निर्णयाने सगळे झाले चकित, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात घडली घटना

अरेरे! भारताची एकमेव जिम्नॅस्ट प्रणती नायक फायनल्समध्ये स्थान मिळवण्यात अपयशी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---