---Advertisement---

BREAKING: बीसीसीआयकडून नव्या निवडसमितीची घोषणा, यांच्या खांद्यावर दिली जबाबदारी

On: सोमवार, जून 19, 2023 5:26 PM
bcci-logo
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी (19 जून) भारतीय महिला क्रिकेट संघाच्या निवड समितीतील तसेच ज्युनिअर क्रिकेट समितीच्या प्रत्येकी एका रिक्त सदस्याची नियुक्ती केली. सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा ​​आणि जतिन परांजपे यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) अनुक्रमे महिला निवड समिती आणि ज्युनियर क्रिकेट समिती यांच्यासाठीचे अर्ज तपासले. या पदांसाठी समितीने एकमताने श्यामा डे शॉ आणि श्री व्हीएस थिलक नायडू यांची शिफारस केली आहे. या जागा मागील काही काळापासून रिक्त होत्या.

शॉ यांनी खेळाडू म्हणून डावखुऱ्या फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज अशा भूमिकेत कारकीर्द घडवली. त्यांनी तीन कसोटी आणि पाच वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी प्रथम 1985 ते 1997 पर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व केले आणि नंतर 1998 ते 2002 पर्यंत रेल्वेचे प्रतिनिधित्व केले. तसेच खेळाडू म्हणून कारकिर्द पूर्ण केल्यानंतर, त्यांनी दोन वेळा बंगालच्या निवडकर्ता म्हणून काम पाहिले.

दुसरीकडे नायडू हे यष्टिरक्षक आणि फलंदाज अशा भूमिकेत दिसत. त्यांनी 1998-99 ते 2009-10 पर्यंत कर्नाटकचे तसेच दुलीप ट्रॉफी आणि देवधर ट्रॉफीमध्ये दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीने त्यांनी 93 प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये 4386 धावा केल्या. 2013 ते 2016 पर्यंत, त्यांनी कर्नाटक कनिष्ठ निवड समितीचे अध्यक्षपद भूषवले. तर, 2015-16 हंगामात कर्नाटकच्या वरिष्ठ निवड समितीवरही काम केले.

महिला निवड समिती:  नीतू डेव्हिड (अध्यक्ष), रेणू मार्गारेट, आरती वैद्य, कल्पना व्यंकटाचा, श्यामा डे शॉ.

कनिष्ठ क्रिकेट समिती:  व्हीएस थिलक नायडू (अध्यक्ष), रणदेब बोस, हरविंदर सिंग सोधी, पथिक पटेल, कृष्ण मोहन.

(BCCI announces Women’s Selection Committee & Junior Cricket Committee appointments)

महत्वाच्या बातम्या –
बापरे! बाल्कनीत बसून सामना पाहत होती महिला, फलंदाजाने षटकार मारल्यानंतर पुढे काय घडलं पाहाच
जागतिक योगा दिवस 2023 । केव्हा आणि कशी झाली योगा दिनाची सुरुवात? जाणून घ्या इतिहास 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---