भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी हंगामासाठी खेळाडूंच्या वार्षिक कराराची (Central Contract) यादी जाहीर केली आहे. यामध्ये काही खेळाडूंची प्रगती झाली आहे, तर काही दिग्गज खेळाडूंना मोठा धक्का बसला आहे.
कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुबमन गिलला (Shubman gill) बढती (Promotion) मिळाली आहे. याउलट, रोहित शर्मा (Rohit Sharma & Virat Kohli) आणि विराट कोहली यांच्या ग्रेडमध्ये कपात (Demotion) करण्यात आली आहे. रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांनी आपले सर्वोच्च स्थान (Highest Grade) कायम राखले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बीसीसीआयने अनेक नामांकित खेळाडूंना करारातून बाहेर केले आहे. यात सर्वात धक्कादायक नाव म्हणजे दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही शमीला (Mohmmed Shami) सातत्याने भारतीय संघातून वगळण्यात आले आणि आता करारातूनही त्याचे नाव गायब झाले आहे. टी-20 संघात पुनरागमन करूनही इशान किशनला (Ishaan kishan) स्थान मिळालेले नाही. देशांतर्गत क्रिकेट न खेळल्यामुळे गेल्या वर्षीही त्याला करारातून बाहेर ठेवण्यात आले होते.
यावेळेस सरफराज खान, रजत पाटीदार (RCB कर्णधार) आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमार यांनाही सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट दिलेले नाही.
करारातून बाहेर झालेले 5 प्रमुख खेळाडू:
मोहम्मद शमी
इशान किशन
रजत पाटीदार
सरफराज खान
मुकेश कुमार





