बीसीसीआय लवकरच भारतीय संघाच्या जर्सीच्या स्पॉन्सरशीप करारासाठी नवीन टेंडर (निविदा) मागवणार आहे. कारण भारतीय संघाच्या जर्सीची स्पॉन्सर नाईकी कंपनीने या कराराचे नुतनीकरण (रिन्यू) न करण्याचा निर्णय घेतला आहे. नाईकी कंपनीचा बीसीसीआयशी असलेला करार हा यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये संपणार आहे. शुक्रवारी (१७ जुलै) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत झालेल्या बीसीसीआयच्या अपेक्स काऊंसिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
नाईकी बीसीसीआयला देते ३० कोटी रुपयांची रॉयल्टी
नाईकीने ४ वर्षांच्या करारासाठी बीसीसीआयला (BCCI) ३७० कोटी रुपये दिले होते. यामध्ये ८५ लाख रुपये प्रति सामना फी आणि ३० कोटी रॉयल्टीचा समावेश होता.
आंतरराष्ट्रीय मालिका रद्द झाल्यामुळे नाईकीचे झाले नुकसान
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईकी कंपनीला हा करार (Contract) रिन्यू करायचा होता. कारण लॉकडाऊनमुळे त्यांचे खूप नुकसान झाले होते. कोरोना व्हायरसमुळे मार्च महिन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील वनडे मालिका रद्द करण्यात आली होती. याव्यतिरिक्त भारतीय संघाचा श्रीलंका आणि झिंबाब्वे दौरादेखील रद्द झाला होता. नाईकीला नुकसान झाल्यामुळे बीसीसीआयबरोबरचा हा करार पुढे चालू ठेवायचा होता. परंतु शेवटी हा करार रिन्यू न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नाईकी कंपनीच्या (Nike Company) करारानुसार, नाईकी भारतीय संघाला बूट, जर्सी आणि इतर साहित्य मोफत देते. नाईकी कंपनीने बीसीसीआयशी पहिल्यांदा हा करार २००६ मध्ये केला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-शतक ठोकल्यानंतर बेन स्टोक्स बोट वाकडे करून करतो आनंद साजरा; जाणून घ्या कारण
-१०० कसोटी खेळलेल्या क्रिकेटरची २०२० आयपीएल ठरणार शेवटची स्पर्धा
-विराट-सौरव-सचिन-द्रविड यांची तक्रार करणाऱ्या व्यक्तीचा अखेर राजीनामा