अहमदाबाद येथे गुरुवारी (२४ डिसेंबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियम येथे झालेल्या या बैठकीत इंडियन प्रीमियर लीगविषयी मोठा निर्णय घेण्यात आला. आयपीएल २०२२ पासून पुढील सर्व हंगामात ८ नव्हे तर एकूण १० संघ खेळतील, असे या बैठकीत ठरवण्यात आले आहे. परंतु आयपीएल २०२१ चा पूर्ण हंगाम ८ संघांसोबतच खेळवला जाईल.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने न्यूज एजन्सी पीटीआयला यासंदर्भात माहिती दिली आहे. “आयपीएल २०२२ मध्ये २ नवे संघ सहभागी करण्यात येतील. तसेच कोविड-१९मुळे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना झालेल्या नुकसानाची भरपाई बीसीसीआय करणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
Board of Control for Cricket in India (BCCI) approves 10-team IPL from 2022, in its annual general meeting today pic.twitter.com/AGEEFvx5Ke
— ANI (@ANI) December 24, 2020
The BCCI has approved a 10-team IPL from 2022. The decision was ratified by the BCCI's general body comprising the state associations at the board's annual general meeting on Thursday in Ahmedabad
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 24, 2020
आयपीएल २०२०च्या समाप्तीनंतर पुढील आयपीएलमध्ये १० संघ खेळवले जाणार आहेत, अशी चर्चा होती. मात्र, आता ही योजना रद्द झाली आहे. बीसीसीआयच्या माहितीनुसार, “पुढील आयपीएलमध्ये १० संघ सहभागी होणार नाहीत. आणखी एक वर्ष ही स्पर्धा ८ संघांसोबतच खेळवली जाईल. त्यापुढील वर्षात २ नव्या संघांना सामील करण्यात येईल.”
बीसीसीआयला होईल तोटा
एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, “आयपीएल २०२१ मध्ये दोन नवीन संघ सहभागी करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी शिल्लक आहे. त्यासाठी नव्या खेळाडूंचा लिलाव करावा लागेल. या सर्वांसाठी वेळ अत्यंत कमी आहे. दहा संघासह आयपीएल खेळण्याची कल्पना २०२२ मध्येच पूर्णत्वास येऊ शकते. स्टार स्पोर्ट्स या प्रसारण वाहिनीशी बीसीसीआयने २०२१ पर्यंत करार केला आहे. २०२१ मध्ये दोन नवीन संघ सहभागी झाल्यास, ९४ सामने खेळले जाऊ शकतात. अशावेळी, प्रसारण हक्कातून बीसीसीआयला तोटा होऊ शकतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
पिता बनलेला नटराजन अजूनही ऑस्ट्रेलियात, त्याच्यासाठी वेगळे नियम का?, गावसकरांचा बीसीसीआयला सवाल
गल्ली क्रिकेट खेळणाऱ्या चिमुकल्यात दिसली वॉर्नरची झलक; चाहत्यांचा व्हिडिओला मोठा प्रतिसाद