भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय बोर्डाने मंगळवारी (दि. 04 जुलै) भारतीय वरिष्ठ पुरुष संघाच्या नवीन मुख्य निवडकर्त्याच्या रूपात अजित आगरकर याची निवड केली. आगरकर दीर्घ काळ भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. अशात मुख्य निवडकर्त्याचा पदभार सांभाळून तो भारतीय क्रिकेटचा फायदा करू शकतो. आगरकरपूर्वी जवळपास 5 महिने मुख्य निवडकर्त्याचे पद रिकामे होते. यामागील कारण, मुख्य निवडकर्त्याचा पगार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता बीसीसीआयने मुख्य निवडकर्त्याच्या पगारात तीन पटींनी वाढ केली आहे.
किती वाढवला पगार?
असे म्हटले जात होते की, भारताच्या कोणत्याच माजी खेळाडूंनी कमी पगार असल्यामुळे या पदासाठी उत्सुकता दाखवली नव्हती. मात्र, आता बीसीसीआयने तीन पटींनी मुख्य निवडकर्त्याचा पगार वाढवला (BCCI Triples Salary of Chief Selector) आहे. आधी मुख्य निवडकर्त्याला वर्षाकाठी 1 कोटी रुपये पगार मिळायचा.
भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य निवडकर्त्याला आधी वर्षाला 1 कोटी रुपये मिळायचे. मात्र, आता यामध्ये तीन पटींनी वाढ झाली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, आता मुख्य निवडकर्त्याला वर्षाकाठी 3 कोटी रुपये पगार मिळेल. तसेच, निवड समितीतील इतर सदस्यांना 90 लाख रुपये वार्षिक पगार दिला जायचा, यामध्येही वाढ होईल. असे म्हटले जात आहे की, इतर सदस्यांच्या पगारात अद्याप वाढ करण्यात आली नाहीये.
The annual salary of Ajit Agarkar will be 3 crores.
Earlier it was 1 Crore. [Cricbuzz] pic.twitter.com/k1aqEhF6BM
— Johns. (@CricCrazyJohns) July 5, 2023
चेतन शर्मा होते मुख्य निवडकर्ते
विशेष म्हणजे, अजित आगरकर याच्यापूर्वी माजी दिग्गज खेळाडू चेतन शर्मा भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते होते. त्यांनी दीर्घ काळ हे पद सांभाळले. मात्र, एका न्यूज चॅनेलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये केलेल्या धक्कादायक खुलास्यांनंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर 5 महिने मुख्य निवडकर्त्याचे पद कमी होते.
अजित आगरकर अजूनही सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. तो पुढील आठवड्यात पदभार सांभाळेल. दुसरीकडे, पुढील आठवड्यात आगरकर वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करू शकतात. (BCCI board triples salary of chief selector ajit agarkar will get rs 3 crore read more)
महत्वाच्या बातम्या-
अरेरे! विजय शंकरचा संघ TNPL स्पर्धेतून OUT, ‘या’ 4 संघांनी मिळवला प्ले-ऑफमध्ये एन्ट्री करण्याचा मान
Big Breaking: माजी भारतीय खेळाडूचा भयानक अपघात, थोडक्यात वाचला जीव; मुलगाही होता सोबत