---Advertisement---

रिषभ पंत, केएल राहुल यावर्षी होणार मालामाल? बीसीसीआयच्या वार्षिक करारात होऊ शकतो ‘हा’ फायदा

---Advertisement---

दरवर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) (BCCI Central contract) करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर करण्यात येत असते. लवकरच २०२२ वर्षांसाठी करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर करण्यात येऊ शकते. ज्यामध्ये काही खेळाडूंना फायदा होऊ शकतो. तर संघातील काही वरिष्ठ खेळाडूंचे मोठे नुकसान होऊ शकते.

गतवर्षी ४ श्रेणीमध्ये एकूण २८ खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. यावेळी देखील करारबद्ध खेळाडूंच्या यादीत बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, केएल राहुल (Kl Rahul) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांना बढती दिली जाऊ शकते. तसेच गेल्या काही महिन्यांपासून फ्लॉप ठरत असलेल्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराचे मोठे नुकसान होऊ शकते.

बीसीसीआयतर्फे दरवर्षी खेळाडूंची ४ श्रेणीत विभागणी केली जाते. ज्यामध्ये ए प्लस, ए, बी आणि सी श्रेणीचा समावेश असतो. ए प्लस श्रेणीत मोडणाऱ्या खेळाडूला वर्षाला ७ कोटी रुपये मानधन दिले जाते, तर ए श्रेणीत मोडणाऱ्या खेळाडूला ५ कोटी, बी श्रेणीत मोडणाऱ्या खेळाडूला वर्षाला ३ कोटी आणि सी श्रेणीत मोडणाऱ्या खेळाडूला वर्षाला १ कोटी रुपये मानधन दिले जात असते.

सध्या माध्यमांतील वृत्तानुसार भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे ए प्लस श्रेणीत कायम राहणार आहे, तर केएल राहुल आणि रिषभ पंत यांना बढती दिली जाऊ शकते.

शार्दुल ठाकूरने गेल्या काही महिन्यांपासून तीनही स्वरूपात चांगली कामगिरी केली आहे. ज्यामुळे त्याचा ए श्रेणीत समावेश करण्यात येऊ शकतो. गतवर्षी तो ग्रेड बी श्रेणीत होता. तसेच मोहम्मद सिराजने देखील चांगली कामगिरी केली आहे. त्याला देखील बढती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच हनुमा विहारी आणि शुबमन गिलला देखील बढती मिळू शकते.

गतवर्षातील करारबद्ध खेळाडू 

 ए प्लस श्रेणी : विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह.

 ए श्रेणी : रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषभ पंत, हार्दिक पंड्या.

बी श्रेणी: वृद्धिमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, मयांक अगरवाल

सी श्रेणी: कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, शुबमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज.

महत्वाच्या बातम्या :

मोठी बातमीः ‘रोहितसेने’साठी विश्वचषकाचा पहिला टप्पा आहे सोप्पा, भारताच्या ‘अ’ गटात आहेत हे संघ

मोठा बातमीः भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने, याचवर्षी ‘या’ दिवशी खेळणार सामना

हे नक्की पाहा:

अभ्यासू कीडा असलेला Axar Patel फक्त आज्जीमुळे बनला क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---