बीसीसीआयने (BCCI) नुकताच भारतीय संघाचा २०२२-२३ वर्षाचा केंद्रीय करार (BCCI Central Contract) जारी केला आहे. यावेळी २८ खेळाडूंना या करारामध्ये जागा देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या करार यादीत ग्रेड बी मिळवलेल्या खेळाडूंमध्ये चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा यांचा समावेश आहे. एकूण ७ खेळाडूंना या यादीत स्थान मिळाले आहे. भारतीय संघामध्ये असे तीन खेळाडू आहेत, जे केंद्रीय करारात ग्रेड बीचे दावेदार होते, परंतु बीसीसीआयने त्यांना पात्र मानले नाही. या लेखात आपण या तीन खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.
१. दीपक चाहर
या यादीत पहिले नाव आहे ते म्हणजे भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरचा (Deepak Chahar). त्याने मागील दोन वर्षांमध्ये आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये सीएलके संघाकडून पदार्पण केलेला हा खेळाडू आपल्या गोलंदाजीने सर्वांना चकित करत आहे. आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात सीएसकेने या गोलंदाजाला १४ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. त्याने कसोटी क्रिकेटशिवाय एकदिवसीय आणि टी२० मालिकासुद्धा खेळल्या आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्या टी२० मालिकेत चाहरने शानदार कामगिरी केली आहे. दीपकने क्रिकेटच्या सर्वात लहान प्रकारामध्ये विश्वविक्रम केला आहे. १० नोव्हेंबर २०१९ नागपूरमध्ये बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात ३.२ षटकात ७ धावा देत तब्बल ६ विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएलच्या १३ व्या हंगामात त्याने सीएसकेकडून खेळताना धावा देखील केल्या होत्या. त्याच्या चमकदार कामगिरीनंतर बीसीसीआयने त्याला ग्रेड बी ऐवजी ग्रेड सीमध्ये स्थान दिले आहे. हे स्थान त्याच्या खेळी पाहता योग्य नाही.
२. युझवेंद्र चहल
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal). या फिरकी गोलंदाजाने २०११ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. यावेळी तो आपली ओळख निर्माण करू शकला नाही. त्यानंतर २०१४ मध्ये आरसीबी संघात स्थान मिळवले. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ११४ सामन्यांत १३९ विकेट घेतल्या आहेत. त्याने २५ धावा देत ४ विकेट्स घेतलेली सर्वोत्तम खेळी होती. त्याने भारतीय संघासाठी ६१ एकदिवसीय सामने खेळले असून १०४ विकेट त्याने घेतल्या आहेत. टी२० क्रिकेटमध्ये त्याने ५४ सामने खेळले असून एकूण ६८ विकेट्स घेतल्या आहेत. चहलमुळे भारतीय संघाला अनेकदा विजय मिळाला आहे. त्याच्या अशा खेळीनंतर देखील बीसीसीआयने त्याला ग्रेड बी ऐवजी ग्रेड सीमध्ये स्थान दिले आहे.
३. सूर्यकुमार यादव
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई इंडियन्सचा डाव्या हाताचा फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे, तेव्हा- तेव्हा त्याने आपल्या चाहत्यांना त्याच्या खेळीने चकित केले आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात २०१० मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट पासून केली होती. मुंबई संघाकडून खेळताना त्याने दिल्ली संघाविरुद्ध ८९ चेंडूत ७३ धावा केल्या होत्या. त्याने एकदिवसीय क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध ५७ धावांची खेळी केली होती.
त्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर २०१४ मध्ये कोलकत्ता संघाकडून खेळत सुरुवात केली. २०१५ मध्ये मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध कोलकताच्या इडन गार्डन्सवर २० चेंडूत ५ षटकारांच्या मदतीने ९८ धावा केल्या होत्या. त्यावेळी तो आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध खेळाडू बनला होता. या परिस्थीतीत त्याला बीसीसीआयने सूर्यकुमार यादवला ग्रेड बी ऐवजी ग्रेड सीमध्ये स्ठान दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटचा १०० व्या कसोटीत बीसीसीआय अध्यक्षांच्या विक्रमालाच धक्का, पाहा काय केलाय कारनामा
कोण आहे पाकिस्तानचा युवा सलामीवीर, ज्याने चक्क कमिन्सला फोडला घाम