---Advertisement---

एमएस धोनी बाबतची बीसीसीयने सुधारली ही मोठी चूक

On: शनिवार, जुलै 21, 2018 7:55 PM
---Advertisement---

कॅप्टनकूल अशी ओळख असणाऱ्या एमएस धोनीने भारताचे कर्णधारपद सोडून जवळजवळ दोन वर्ष झाली आहेत. मात्र तरीही गुरुवार,19 जुलै 2018 पर्यंत बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाइटवर धोनीच्या प्रोफाइलपुढे तोच भारताचा कर्णधार असल्याचे दिसत होते.

पण आता ही चूक बीसीसीआयने सुधारली असुन त्यांनी धोनीच्या नावापुढील कर्णधार शब्द काढून टाकला आहे.

तसेच सध्याचा भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या प्रोफाइलमध्ये फलंदाज आणि त्यापुढे कंसात कर्णधार असे लिहिले आहे. यात बीसीसीआयने काहीही बदल केलेला नाही.

धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने वनडे विश्वचषक, टी20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा आयसीसीच्या तीनही मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत.

धोनीने 2007 ते 2016 दरम्यान भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळले. त्याने जानेवारी 2017 मध्ये मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधारपद सोडले. तर त्याआधीच धोनीने डिसेंबर 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

त्यामुळे कसोटी क्रिकेटबरोबरच मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसाठीही भारतीय संघाच्या नेतृत्वाची धूरा विराटकडे सोपवण्यात आली होती.

धोनीने भारताचे 199 वनडे, 60 कसोटी आणि 72 टी20 असे मिळून एकूण 331 सामन्यात कर्णधारपद भूषवले आहे.

बीसीसीआयने बदललेले धोनीचे प्रोफाइल:

Screengrab: MS Dhoni’s profile on BCCI’s official website bcci.tv

गुरुवार, 19 जुलै 2018 पर्यंत बीसीसीआयच्या वेबसाइटवर असे होते धोनीचे प्रोफाइल:

Screengrab: MS Dhoni’s profile on BCCI’s official website bcci.tv

महत्त्वाच्या बातम्या:

तिरंदाजी विश्वचषकात भारतीय महिलांना रौप्यपदक तर मिश्र संघाला कांस्यपदक

टॉप 5: पाकिस्तान-झिम्बाब्वे यांच्यातील चौथ्या सामन्यात झाले हे खास विक्रम

विराट कोहली, शिखर धवन कुटुंबासमवेत घेत आहेत सहलीचा आनंद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment