चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील भारतीय संघाच्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोठा निर्णय घेतला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमच्या खेळपट्टीवर नजर ठेवणाऱ्या पिच क्युरेटर तपोश चॅटर्जी याला (खेळपट्टीवर नजर ठेवणारा) बीसीसीआयने काढून टाकले आहे. त्यामुळे आता शनिवारपासून (१३ फेब्रुवारी) सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन मुख्य स्थानिक ग्राऊंडमॅन व्ही. रमेश कुमार यांच्यासह खेळपट्टीच्या तयारीवर देखरेख ठेवत आहेत.
तपोश यांना हटवून अनुभव नसणाऱ्या कुमार यांना हे काम सोपवल्याचा बीसीसीआयचा हा निर्णय चकित करणारा होता. कारण कुमार यांच्याकडे प्रथमश्रेणी समन्यांसाठी देखील खेळपट्टी तयार करण्याचा अनुभव नाही. तरीही आता बीसीसीआयने त्यांच्यावर हे जबाबदारीचे काम सोपवले आहे. तर दुसरीकडे तसोश यांना पहिला सामना संपल्यानंतर लगेचच माघारी पाठविले गेले. आता त्यांना इंदोर आणि जयपूर येथे होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यांसाठी खेळपट्ट्यांच्या पाहणीवर नजर ठेवण्याचे काम सोपवले आहे.
तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी नवा पिच क्यूरेटर
बीसीसीआयकडे पिच क्युरेटरचे मोठे पॅनल आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात आशिष भौमिक अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमच्या खेळपट्टीची बांधणी करताना दिसतील. त्यासोबतच प्रशांत के, सुनील चौहान आणि प्रकाश आढाव याचासुध्दा पॅनलमध्ये समावेश असणार आहे.
टीएनसीएने केली तपोश यांना हटविण्याची पुष्टी
तमिलनाडु क्रिकेट असोसिएशन (टीएनसीए)चे सचिव आर.एस. रामास्वामी यांनी तपोश यांना हटवण्यात आले असल्याच्या वृत्ताची पुष्टी दिली आहे. “पहिल्या सामन्यासाठीचे पिच क्यूरेटर तपोश यांना काढून टाकण्यात आले आहे. त्यांच्याजागी कुमार हे दुसऱ्या कसोटीच्या तयारीवर देखरेख ठेवतील,” असे त्यांनी आयएएनएसला सांगितले आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी काळ्या मातीचा वापर
पहिल्या कसोटीच्या वेळी चेन्नईच्या खेळपट्टीवर लाल मातीचा वापर केला होता. ज्यामुळे भारतीय संघाला अखेरच्या डावात फलंदाजी करण्यात समस्या उद्भवल्या. परंतु आता दुसऱ्या सामन्यासाठी काळ्या मातीचा वापर करण्यास येणार आहे.
पहिल्या कसोटीत पाहुण्यांचा विजय
इंग्लंड आणि भारत यांच्यात चार सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर पार पडला आहे. या सामन्यात पाहुण्या इंग्लंडने यजमान भारतावर २२७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह त्यांनी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना चेन्नईच्याच मैदानावर १३ फेब्रुवारीपासून खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
ये दीवार टूटती क्यों नहीं है भाई? कोहलीनंतर पुजारा होता कमिन्सच्या निशाण्यावर, आता स्वत:च केलं कौतुक
परदेशात हिरो अन् मायदेशात झिरो! भारतात रहाणेची फलंदाजी सरासरी चक्क पुजारापेक्षाही कमी
नाम बडे और दर्शन खोटे! ‘या’ तीन खेळाडूंची आयपीएलमधून होऊ शकते सुट्टी