---Advertisement---

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल होणार स्थगित? बीसीसीआय अधिकाऱ्याने दिले ‘हे’ उत्तर

On: सोमवार, मे 3, 2021 11:14 PM
---Advertisement---

आयपीएल 2021 स्पर्धा बायोबबल मध्ये उत्तम रित्या सुरू असतांनाच ज्या बाबीची भीती होती तेच घडले. अखेर कोरोनाने आयपीएल मध्ये विघ्न आणले असून दिनांक 3 मे रोजी होणार कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. या सर्व परिस्थितीत आयपीएलच्या आगामी सामन्यांबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात होते. आयपीएलचा यंदाचा हंगाम रद्द होईल अशाही चर्चा रंगत होत्या. आता या सर्व चर्चांना ब्रेक लागला असून बीसीसीयायने आत या बाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बंगलोर व कोलकता मधील सामना पुढे ढकलण्याचे कारण हे कोलकता संघातील 2 सदस्यांना झालेला कोरोना हे आहे. कोलकता संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि वेगवान गोलंदाज संदीप वॉरियर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझीटिव्ह आला आहे. त्यामुळे सामना पुढे ढकलण्यात आल्याचे कळते. या दोन्ही खेळाडूंना संघापासून वेगळे ठेवण्यात आले आहे. कोलकताचा पुढील सामना 8 मे रोजी दिल्ली कॅपिटल सोबत होणार आहे. त्यामुळे तो सामना देखील पुढे ढकलला जाण्याची चर्चा आहे. यादरम्यानच बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की सध्या तरी आयपीएल सामने पुढे ढकलण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही.

यादरम्यान माहिती समोर येत आहे की बीसीसीआय लवकवरच कोलकता आणि बंगलोर दरम्याच्या सामन्याच्या तारखीची घोषणा करणार आहे. आयपीएल हंगाम जवळजवळ अर्धा संपलेला असून आता संघामधील चढाओढ आणखीनच वाढलेली आहे. सर्व क्रिकेट प्रेमींना आशा असेल की कोरोना काळात सुयोग्य रित्या सुरू असलेली आयपीएल स्पर्धा आगामी काळात देखील कोणतेही विघ्न न येता पूर्ण होईल.

महत्वाच्या बातम्या:

आयपीएल स्पर्धा गाजवणारे हे ५ खेळाडू आगामी काळात करू शकतात भारतीय संघाकडून पदार्पण

पायातील बूट स्टंपला लागल्याने खेळाडू झाला अजबच पद्धतीने बाद, पाहा व्हिडिओ

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारतासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने केला मदतीचा हात पुढे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---