---Advertisement---

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर टीम इंडिया करणार सराव, धोनीबद्दल मात्र…

On: बुधवार, जुलै 22, 2020 2:39 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ मार्च महिन्यापासून कोणताही क्रिकेट सामना खेळला नाही. हेच काय भारतीय क्रिकेटपटू सरावसुद्धा करताना फारसे दिसले नाही. कोरोना व्हायरसमुळे क्रीडाविश्वाला मोठा दणका बसला असून त्यातून क्रिकेटही सुटले नाही.

परंतु क्रिकेट आता हळूहळू पुर्वपदावर येत आहे. इंग्लंड आगामी काळात आयर्लंड, पाकिस्तान व ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रिकेट मालिका खेळणार आहे. तर बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड संघाने एकत्रित सरावाला सुरुवात केली आहे. फक्त भारत व अफगाणिस्तानच्या संघाच्या सरावाचे कोणतेही वृत्त येत नव्हते.

परंतु आता भारतीय क्रिकेट बोर्ड एक खेळाडूंच्या सरावासाठी खास योजना आखत आहे. यासाठी जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेेडियम, अहमदाबाद वर भारतीय संघ सराव करताना दिसून येऊ शकतो. या स्टेडियमचे जुने नाव मोटेरा स्टेडियम असे होते. या स्टेडियमची क्षमता १ लाख १० हजार प्रेक्षकांची आहे. याच स्टेडियममध्ये ४ ड्रेसिंग रुम व चांगला क्लब हाऊस आहे.

जगातील संघांनी सराव शिबीराचे आयोजन करताना करारबद्ध खेळाडूंनाच शक्यतो प्राधान्य दिले आहे. त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेट बोर्ड देखील करारबद्ध खेळाडूंना घेऊनच सराव शिबीराचे आयोजन करणार आहे. धोनीचा बीसीसीआय बरोबर कोणताही करार नसल्याने त्याला मात्र या शिबीरात सामील होता येण्याची शक्यता फारच कमी आहे. बीसीसीआयने २०१९-२० या वर्षासाठी केलेल्या करारातून धोनीला वगळले होते.

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहिलेला व जगातील सर्वात यशस्वी मर्यादीत षटकांचा कर्णधार अशी ओळख असलेला धोनी गेल्या १ वर्षापासून क्रिकेटपासून दुर आहे. तसेच तो आपल्या निवृत्तीसाठी एका चांगल्या मालिकेच्या प्रतिक्षेत आहे.

वाचा- इरफान पठाण- युवराज ट्विटरवरच एकमेकांना भिडले, तुला म्हणायचंय का भारताकडे...

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---