इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने नुकतीच भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान कसोटी मालिका इंग्लंडमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. पाकिस्तानमध्ये झालेल्या पीसीबी अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी हा प्रस्ताव मांडलेला. मात्र, या प्रस्तावाला आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केराची टोपली दाखवल्याचे वृत्त समोर येत आहे. नजीकच्या काळात तरी ही मालिका शक्य नसल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात येतेय.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष मार्टिन डार्लो यांनी नुकतीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये सध्या सात सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. ईसीबी भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान इंग्लंडमध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे तटस्थ आयोजक म्हणून यजमानपद भूषवण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटले. ही मालिका इंग्लंडमध्ये राहणाऱ्या आशियाई लोकांना आकर्षित करू शकते असे त्यांचे मत आहे. तसेच यामुळे क्रिकेटच्या लोकप्रिय तिथेही वाढ होईल असे त्यांनी म्हटले.
एका प्रमुख वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय अधिकाऱ्यांनी याबाबत आपले मत सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “ईसीबीने पीसीबीला भारत-पाकिस्तान मालिकेविषयी विचारणे हेच मुळता हस्यास्पद वाटते. अशा प्रकारची मालिका आयोजित करणे आमच्या हातात नव्हे तर सरकारच्या हातात आहे. पुढील काही वर्ष तरी अशी मालिका खेळली जाण्याची कोणतीही शक्यता नाही. आम्ही जास्त पुढचे काही सांगू शकत नाही.”
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांचे क्रिकेटप्रेमींना नेहमीच आकर्षण असते. मात्र, दोन्ही देशातील राजकीय संबंधांमुळे द्विपक्षीय मालिका आयोजित केल्या जात नाहीत. दोन्ही देशात अखेरच्या वेळी 2013 मध्ये भारतात मर्यादित षटकांच्या मालिका झालेल्या. तेव्हापासून दोन्ही देश केवळ आयसीसी विश्वचषक व आशिया चषकात एकमेकांशी भिडतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आणखी एक क्लीन स्वीप! टीम इंडियाचे न्यूझीलंडविरुद्ध निर्भेळ यश; संजूचे प्रभावी नेतृत्व
संजूची लागली लॉटरी? विश्वचषकाच्या तोंडावर टीम इंडियात मिळणार महत्त्वाची जबाबदारी
INDvSA| हार्दिकसह तीन खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर; ताज्या दमाच्या खेळाडूंना संधी






