---Advertisement---

किती ही संकटे! बीसीसीआयच्या संकटात अजून पडली नवी भर, कुणीही घेईना पुढाकार

On: बुधवार, सप्टेंबर 2, 2020 4:36 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील सर्व क्रिकेट बोर्डांना मोठे नुकसान झेलावे लागले आहे. यामध्ये जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयचाही समावेश आहे. एका बाजूला, बीसीसीआयला चीनशी झालेल्या सीमावादामुळे विवो कंपनीशी करार मोडत, ड्रीम ११ला तोट्यात आयपीएलचा स्पॉन्सर बनवावे लागले. तर दूसऱ्या बाजूला आता बीसीसीआयला अजून मोठा झटका बसला आहे.

झाले असे की, भारतीय संघाच्या नव्या जर्सीच्या स्पॉन्सरशीपसाठी बीसीसीआयने जे टेंडर काढले होते, त्यात कोणत्याही कंपनीने रुची दाखवलेली नाही. म्हणजे आता भारतीय संघाचा कोणीही किट स्पॉन्सर नाही. BCCI Failed To Get New Kit Sponsor

भारतीय संघाची जुनी किट प्रायोजक नाइकी आणि बीसीसीआयचा करार संपला आहे. त्यांच्यादरम्यान ३० कोटींच्या रॉयल्टीसह ३७० कोटी रुपयांमध्ये ४ वर्षांचा करार करण्यात आला होता. हा करार संपल्यानंतर बीसीसीआयने प्रायोजकत्व आणि अधिकृत विक्री भागीदारी अधिकारांसाठी नवे टेंडर काढले होते.

यामध्ये क्रिडा सामान आणि फुटवियर निर्माता जर्मन कंपनी पूमा ही भारतीय क्रिकेट संघाचे कीट प्रायोजकत्त्व अधिकार विकत घेण्याच्या स्पर्धेत सर्वात पुढे होती. असेही म्हटले जात होते की, अदिदास कंपनीदेखील या स्पर्धेत सहभागी होणार होती. पण, आता टेंडरची तारिख संपली आहे तरीही कोणीही भारतीय संघाचे किट प्रायोजन विकत घेण्यासाठी पुढे आलेले नाही. त्यामुळे आता भारतीय संघाचा कोणताही सामना झाल्यास त्यांच्या जर्सीवर बीसीसीआयव्यतिरिक्त दूसरा कोणताही लोगो दिसणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

काय तर, बेल्स हरवल्यामुळे सामना सुरु झाला नाही!

मुंबई इंडियन्सच्या हा शिलेदार अडकला होता चक्क चीयरलीडरच्या प्रेमात, आज तीच आहे…

वयाची चाळीशी जवळ आली तरी ‘या’ क्रिकेटरची नाही तोड, नोंदवलाय टी२० कारकिर्दीतील मोठा पराक्रम

ट्रेंडिंग लेख –

आयपीएल २०२०: युएईतील मैदान गाजवणार हे ५ गोलंदाज, फलंदाजांची करणार दांडी गुल

आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून खेळत आहेत हे ३ परदेशी खेळाडू

असे ५ परदेशी क्रिकेटर, जे आयपीएलमधून कमवतात सर्वाधिक पैसे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---