fbpx
Sunday, April 18, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएल २०२०: युएईतील मैदान गाजवणार हे ५ गोलंदाज, फलंदाजांची करणार दांडी गुल

5 bowler uae bother batsmen

September 2, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

भारतातील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलचा १३ व हंगाम १९ सप्टेंबर २०२० पासून युएईच्या मैदानांवर खेळवण्याचे ठरवले. ही स्पर्धा अबू धाबी, दुबई आणि शारजाह या तीन मैदानावर खेळली जाईल. युएईतील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे फलंदाजांना गोलंदाजीचा जपून सामना करावा लागले.

या लेखात जाणून घेऊया अशा ५ गोलंदाजांबद्दल जे युएईच्या मैदानावर आपले अधिराज्य गाजवू शकतात आणि आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना अडचणीत आणू शकतात.

हे आहेत ते ५ गोलंदाज जे युएईच्या मैदानावर देणार फलंदाजांना त्रास-

५. राशिद खान (Rashid Khan)

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज राशिद खान याच्यासाठी आयपीएल २०२० खूप खास ठरू शकते. युएईच्या मैदानावर राशिद खानची गोलंदाजी विरोधी संघासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.

फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असणाऱ्या युएईतील खेळपट्टीवर राशिद फलंदाजांसमोर एक मोठे आव्हान उभे करू शकेल. महत्त्वाचे म्हणजे राशिदला युएईमध्ये खेळण्याचा अनुभव आहे.

आयपीएलच्या मागील हंगामात, त्याने १७ बळी घेतले होते आणि गोलंदाजीच्या क्रमवारीत तो ९ व्या क्रमांकावर होता. या हंगामातही तो सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसेल. आयपीएल २०१८ मध्ये राशिदने २१ बळी घेतले आणि अँड्र्यू टाय नंतर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर होता. सर्व परिस्थितीचा विचार करता हा फिरकी गोलंदाज ‘पर्पल कॅप’ जिंकण्याचा प्रबळ दावेदार असू शकतो.

४. पॅट कमिन्स (Pat Cummins)

पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियन खेळाडूने जगातील जवळजवळ सर्वच मैदानावर गोलंदाजी केली आहे आणि आपल्या राष्ट्रीय संघासाठी बळी मिळवले आहेत. आता आयपीएल २०२० युएईच्या मैदानावर होत आहे, तेव्हा कमिन्स आपल्या वेगवान चेंडूंनी फलंदाजांना त्रास देण्यासाठी सज्ज आहे.

पॅट कमिन्सने २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएलमध्ये प्रवेश केला. २०१७ च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याला विकत घेतले. त्याने दिल्लीकडून १२ सामने खेळले. २०१८ मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला ५ कोटी ४० लाखात खरेदी केले. मात्र दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याला सोडले. कमिन्सने आतापर्यंत १६ सामन्यांत एकूण १७ बळी घेतले आहेत. यंदाच्या हंगामात तो केकेआरमधून खेळताना दिसेल.

३. जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah)

आयपीएलमध्ये डेथ ओव्हर्समध्ये अचूक गोलंदाजीने बळी घेणारा, अचूक यॉर्कर्स चेंडू टाकून मुंबईला विजय मिळवून देणारा, जसप्रीत बुमराह या आयपीएलच्या मोसमातही विरोधी फलंदाजांसाठी समस्या निर्माण करताना दिसू शकतो. दुखापतीनंतर यावर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघाकडून त्याने पुनरागमन केले होते, परंतु त्याची कामगिरी खास झाली नव्हती. त्यामुळे तो स्वत:ला सिद्ध करण्याच्या इराद्यानेही युएईमध्ये खेळताना दिसेल. त्यामुळे युएईच्या मैदानावर बुमराह विरोधी फलंदाजांना नक्कीच एक आव्हान देईल. त्याने आतापर्यंत ७७ आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ८२ विकेट्स घेतल्या आहेत.

२. युजवेंद्र चहल (Yujvendra Chahal)

विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा प्रमुख गोलंदाज युजवेंद्र चहल आयपीएल २०२० मध्ये फलंदाजांसाठी एक  आव्हान ठरू शकेल. चहल प्रत्येक मोसमात आरसीबीकडून चमकदार गोलंदाजी करताना दिसत आहे, पण हा हंगाम त्याच्यासाठी खास असेल. कारण म्हणजे युएईमध्ये असणाऱ्या खेळपट्ट्या ज्या फिरकी गोलंदाजांना मदत करतात.

चहलने आतापर्यंत आयपीएलचे ८४ सामने खेळले आहेत. त्यात त्याने १०० बळी मिळवले आहेत. जर आरसीबीला आयपीएल २०२०  स्पर्धा जिंकण्याची इच्छा असेल तर लेगस्पिनर चहलची चांगली कामगिरी संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल.

१. इम्रान ताहिर (Imran Tahir)

चेन्नई सुपर किंग्जचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहिर देखील आयपीएल २०२० मध्ये युएईच्या मैदानावर फलंदाजाला अडचणीत आणू शकेल. ताहिराला आयपीएल २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या संघात समावेश करून घेतला. ताहिर हा कर्णधार एमएस धोनीचा सर्वात विश्वासू फिरकी गोलंदाज आहे. मागील हंगामात इम्रान ताहिरने कागिसो रबाडाला मागे टाकत १७ सामन्यात २६ गडी घेऊन ‘पर्पल कॅप’ जिंकली.

आता आयपीएल २०२० मध्ये तो पुन्हा एकदा फिरकी गोलंदाजीने विरोधी फलंदाजांना त्रास देताना दिसणार आहे.


Previous Post

अखेर इंग्लंड विश्वविक्रम करण्यापासून थोडक्यात चुकले, नाहीतर….

Next Post

रैनाच्या ट्वीटची घेतली पंजाब सरकारने दखल; उचलले मोठे पाऊल

Related Posts

Photo Courtesy: Screengrab/Hotstar
IPL

क्षेत्ररक्षण करताना ट्रेंट बोल्टचा तोल गेला अन् घडलं असं काही; चाहते म्हणाले, ‘ही फील्डिंग की स्विमिंग’

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘आमच्यासोबत हे काय घडतंय काहीच कळेना,’ सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार वॉर्नरने व्यक्त केली नाराजी 

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चाहर-बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे ‘ऑरेंज आर्मी’ गारद; आयपीएलच्या मोठ्या विक्रमात मुंबईकर अव्वलस्थानी

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

सुपर संडे: आज कोहली-मॉर्गन आमने सामने, ‘अशी’ असेल आरसीबी आणि केकेआरची प्लेइंग XI

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

MIvSRH: रोहितच्या ब्रिगेडचा सलग दुसरा विजय, कर्णधाराने ‘यांना’ ठरवले मॅच विनर

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/@Media_SAI
कुस्ती

Asian Wrestling Championship: भारताचा कुस्तीपटू रवि दहियाने जिंकले सुवर्ण पदक, तर बजरंग पुनिया ठरला रौप्य पदकाचा मानकरी

April 18, 2021
Next Post

रैनाच्या ट्वीटची घेतली पंजाब सरकारने दखल; उचलले मोठे पाऊल

१०वी नापास भारतीय क्रिकेटर, ज्याने वयाच्या केवळ २०व्या वर्षी ऑस्ट्रेलियन दिग्गजाच्या आणली होते नाकी नऊ

वयाची चाळीशी जवळ आली तरी 'या' क्रिकेटरची नाही तोड, नोंदवलाय टी२० कारकिर्दीतील मोठा पराक्रम

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.