नववर्षात भारतीय क्रिकेट संघासमोर अनेक आव्हाने असणार आहेत. भारतीय संघासमोर यावर्षी सर्वात मोठे आव्हान असेल ते म्हणजे वनडे विश्वचषक जिंकण्याचे. याच विश्वचषकाच्या दृष्टीने आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक योजना आखली आहे.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बीसीसीआयची एक बैठक पार पडली. या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा, कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी हजेरी लावली. या बैठकीत काही अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. आगामी वनडे विश्वचषक लक्षात घेता वनडे संघाबाबत मोठे निर्णय घेतले गेले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संघाचा कर्णधार रोहित शर्मा हाच असेल हे सांगण्यात येत आहे.
भारतात ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या या विश्वचषकाआधी भारतीय संघाला जवळपास 25 सामने खेळायचे आहेत. या 25 सामन्यांमध्ये भारतीय संघ एका खास रणनितीने खेळताना दिसेल. केवळ 20 खेळाडूंनाच अदलीबदली करून या विश्वचषकाआधी संधी दिली जाईल. या 20 खेळाडूंमधूनच अंतिम 15 जणांचा संघ निवडला जाईल.
बीसीसीआयचे सचिव जय शहा या मुद्यावर बोलताना म्हणाले,
“बीसीसीआय व संघ व्यवस्थापनाने मिळून 20 खेळाडूंची यादी अंतिम केली आहे. हा 20 जणांना आतापासून विश्वचषकापर्यंत संधी दिली जाईल. या 20 जणांपैकी 15 जण विश्वचषकाचा भाग असतील.”
भारतीय संघाने अखेरच्या वेळी 2011 मध्ये विश्वचषक जिंकलेला. त्यानंतर 2015 व 2019 असा सलग दोन विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले आहे. यावेळी विश्वचषक संपूर्णपणे भारतातच केला जाणार असून, विश्वचषक विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी भारतीय संघाकडे असेल.
(BCCI Final 20 Players Pool For ODI World Cup 2023 Jay Shah Said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
पाकिस्तानसाठी मोहम्मद आमिर पुनरागमन करणार? गोलंदाजाचे मोठे विधान
आता भारतासाठी पदार्पण करणे सोपे नाही! बीसीसीआयच्या आढावा बैठकीत घेतला गेला मोठा निर्णय