भीरतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयची आढावा बैठक रविवारी (1 जानेवारी) पार पडली. मुंबईत पार पडलेल्या या महत्वाच्या बैठकीत काही मुद्यांवर चर्चा केली गेली, ज्यावर संघाला येत्या काळात काम करायचे आहे. खेळाडूंना होणाऱ्या दुखापती आणि त्यांच्या वर्कलोड मॅनेजमेंटविषयी बैठकीय योजना आखल्या गेल्या आहेत. तसेच युवा खेळाडूंना संघात जागा बनवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार असल्याचेही सांगितले गेले आहे.
मागच्या वर्षभरतात भारतीय संघाता अनेक युवा खेळाडूंना पदार्पण केले. पण येत्या काळात मात्र संघासाठी पदार्पण करण्यासाठी युवा खेळाडूंना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनात सांगितले केले की, “बीसीसीआयने रविवारी मुंबईत भारतीय संघाची आढावा बैठक बोलवली. बैठकीत बीसीसीआय अध्यभ रॉजर बिन्नी, सचिव जय शहा, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid), राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख वीवीएस लक्ष्मण आणि पुरुष संघाचे निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा उपस्थित होते.”
पुरेसे देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागणार
बोर्डाने असेही सांगितले की, खेळाडूंना राष्ट्रीय संघात देशांतर्गत क्रिकेटमध्ये दीर्घकाळ खेळावे लागेल. रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी अशा प्रमुख देशांतर्गत स्पर्धांमध्ये गुणवत्ता दाखवल्यानंतरच या खेळाडूंना राष्ट्रीय संघात संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. निवेदनात सांगितले गेले की, “युवा खेळाडूंची भारतीय संघात निवड होण्यासाठी पात्र होण्याआदी पुरेसे देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल.” असे असले तरी, बोर्डाने या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये किती सामने खेळावे लागतील, याविषयी नेमका आकडा सांगितला नाहीये.
टी-20 विश्वचषकानंतर होणार होती आढावा बैठक
दरम्यान, बीसीसीआयची ही आढावा बैठक टी-20 विश्वचषक 2022 संपल्यानंतर लगेच आयोजित केली जाणार होती. पण विश्वचषकानंतर संघाने बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका खेळली आणि याच पार्श्वभूमीवर ही बैठक पुढे ढकलली गेली. बांगलादेशविरुद्धच्या या मालिकेत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारतीय संघाचे डोकेदुखी अधिकच वाढली. यावर्षी भारतात आयसीसी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. आघामी विश्वचषकाच्या धरतीवर आढावा बैठकीत संघाची पुढची वाटचाल कशी असेल, यावर सविस्तर चर्चा केली गेली. (More effort required for international debut! Big decision in BCCI review meeting)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोणी दुबईत तर कोणी काश्मिरमध्ये! टीम इंडियाचे शिलेदार देश-विदेशात साजरा करतायेत ‘न्यू इयर’; पाहा छायाचित्रे
आता ईशान किशन घेणार रिषभ पंतची जागा! महत्वाच्या मालिकेसाठी इतर दोघेही स्पर्धेत