---Advertisement---

रहाणे, पुजाराने कोहलीच्या नेतृत्त्वाबाबत केली तक्रार? बीसीसीआयची याप्रकरणी आली ‘पहिली’ प्रतिक्रिया

Virat Kohli and Ajinkya Rahane
---Advertisement---

मागच्या काही दिवसांपासून विराट कोहलीच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाविषयी आणि त्याने हा निर्णय का घेतला? याविषयी अनेक चर्चा केल्या जात आहेत. माध्यामांतील वृत्तांनुसार विराट आणि भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. तसेच या खेळाडूंनी विराटविषयी बीसीसीआयकडे तक्रार केल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत. मात्र, नेहमीप्रमाणेच आता बीसीसीआयने पुन्हा एकदा ही माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धूमाळ यांनी माहिती दिली आहे.

बीसीसीआय कोषाध्यक्ष अरुण धूमाळ याबाबत टीओआयशी बोलताना म्हणाले, “मीडियाने याबाबत काहीही व्यर्थ गोष्टी लिहणे बंद केले पाहिजे. कोणत्याही भारतीय खेळाडूने बीसीसीआयकडे लिखित किंवा मौखिक तक्रार केलेली नाही. बीसीसीआय समोर येणाऱ्या प्रत्येक खोट्या रिपोर्टवर उत्तर देऊ शकत नाही. तुम्हाला कोणी सांगितली ही गोष्ट?”

धूमाळ पुढे बोलताना म्हणाले, “मीडियाने मला विचारले की, हा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे का? आणि मी नाही म्हटले कारण हेच खरं होतं. बीसीसीआयने कोणताच निर्णय घेतला नव्हता किंवा त्यावर चर्चाही केली नव्हती. विराटने त्याचा निर्णय स्वत: घेतला आणि बीसीसीआयला सांगितला. हा त्याचा निर्णय होता. आज तोच मीडिया म्हणत आहे की, खेळाडूंनी बीसीसीआयकडे तक्रार केली. त्यामुळे बोर्डाच्या वतीने मी तुम्हाला सांगतो की, कोणतीही तक्रार आली नव्हती. अजूनही काही शंका आहे का?”

दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये अशा बातम्या प्रसारीत केल्या जात आहेत, ज्यामध्ये न्यूझीलँविरुद्धच्या जागतिक विश्वचषक स्पर्धेदरम्यान संघातील काही वरिष्ठ खेळाडू आणि विराट यांच्यात वाद झाल्याचे सांगितले जात आहे. या वरिष्ठ खेळाडूंमध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची नावेही समोर येत होती. याच पार्श्वभूमीवर विराटने टी २० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचेही सांगितले जात होते. मात्र, बीसीसीआय कोषाध्यक्षांनी या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले असून या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ज्याच्या हातून दुर्दैवीपणे बाद झाला, त्यालाच कोहलीची ‘ग्रेटभेट’; क्रिकेटपटूंचा क्षण चाहत्यांना भावला

VIDEO: ‘बूम बूम’ची युएईतून थेट युरोपात उडी…! खास गोलंदाजी ऍक्शनने वेधतोय सोशल मीडियाचं लक्ष

मॉर्गनसोबत झालेल्या विवादावर अश्विनचे तिखट प्रत्युत्तर, भल्यामोठ्या ट्वीटसह दिल्या कानपिचक्या

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---