भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पणातच चमकदार कामगिरी करणाऱ्या दोन खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीग 2024 पूर्वी आनंदाची बातमी मिळाली आहे. यामध्ये सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलचा समावेश करण्यात आला आहे. तसेच इशान किशन आणि श्रेयस अय्यरकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष करण्यात आले आहे.
याबाबात बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेची बैठक पार पडली ज्यामध्ये सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांना केंद्रीय करारामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्फराज आणि यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल यांना बीसीसीआयच्या केंद्रीय कराराच्या श्रेणी सी मध्ये स्थान मिळाले आहे आणि त्यांचे वार्षिक रिटेनरशिप फी 1 कोटी रुपये असणार आहे.
अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) केंद्रीय करारामध्ये इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना स्थान न मिळाल्याने बराच गदारोळ झाला होता. रणजी ट्रॉफीमध्ये न खेळल्यामुळे बीसीसीआयने या दोन अनुभवी खेळाडूंना केंद्रीय करारातून वगळले होते. मात्र, नंतर श्रेयस रणजी करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळला होता.
याबरोबरच, इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान सर्फराज आणि जुरेल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर मुंबईकडून देशांतर्गत स्पर्धेत खेळणाऱ्या सर्फराजने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये तीन अर्धशतके झळकावली होती. तसेच ज्युरेलने रांची कसोटीत 90 आणि 39 धावा केल्या होत्या. तर हा त्याचा दुसरा सामना होता आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.
Sarfaraz Khan and Dhruv Jurel have been handed the BCCI's annual central contract of "Grade C". (PTI). pic.twitter.com/4XUzlItRSU
— Tanuj Singh (@ImTanujSingh) March 19, 2024
दरम्यान, बीसीसीआयच्या बैठकीत रणजी ट्रॉफीच्या पुढील हंगामाबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पीटीआयच्या माहितीनुसार, पुढील हंगामात डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात भारताच्या उत्तर भागात रणजी ट्रॉफीचे सामने होणार नाहीत. कारण यावेळी उत्तर भारतात थंडी आणि धुके जास्त असते. त्यामुळे प्रकाश कमी असल्याने खेळाडूंना सामना खेळताना अडचणी येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी मुंबईचा राजा संघात दाखल, पाहा व्हिडिओ
- पाकिस्तानी खेळाडूचा प्रताप! लाइव्ह मॅचदरम्यान सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल