आयपीएलचा 17 वा हंगाम सुरू होण्याआधीच सर्वात जास्त चर्चा रंगली होती ती मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा बाबत. कारण भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सने कर्णधारपद काढून ते हार्दिक पांड्याकडे दिले होते. यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सची कमान हाती घेऊन सरावही सुरु केला आहे. अशातच मुंबई इँडियन्सने एक व्हिडीओ ट्वीट करत रोहित संघासोबत जोडला गेला असल्याचं सांगितलं आहे.
याबरोबरच मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 ( IPL 2024 ) च्या पार्श्वभूमीवर एक पत्रकार परिषद घेतली. मुंबई इंडियन्समधील कॅप्टन्सी बदलानंतर पहिल्यांदाच हार्दिक पांड्या पत्राकारांना सामोरा गेला. यावेळी त्याच्यासोबत मार्क बाऊचर देखील होता. यावेळी पत्रकारांनी हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी बदलाबाबत आणि रोहित शर्माबाबत प्रश्न विचारले. त्यावेळी या दोघांनी उत्तर देणं टाळलं होतं.
त्यानंतर मुंबई इंडियन्सने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. यात दोन मुलं रोहितच्या आगमनाबाबत बोलत आहेत. तसेच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या दोन महिन्यांपासून सलग क्रिकेट खेळत आहे. अशात बीसीसीआयच्या वर्कलोड मॅनेजमेंटनुसार त्याला आरामाची गरज होती. त्यामुळे इतक्या दिवसांपासून रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात रुजू झाला नव्हता. भारतीय संघ आयपीएलनंतर टी20 वर्ल्डकप खेळणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा या स्पर्धेपूर्वी आराम करत होता. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध असणार आहे.
𝗪𝗢𝗛 𝗔𝗔 𝗚𝗔𝗬𝗔… 𝗥𝗢 𝗔𝗔 𝗚𝗔𝗬𝗔! 🔥#OneFamily #MumbaiIndians @ImRo45 pic.twitter.com/TId1LOUgnr
— Mumbai Indians (@mipaltan) March 18, 2024
दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग 2024 ( IPL 2024 ) हंगामाची सुरुवात 22 मार्च रोजी होत आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फ दुखापतीमुळे आगामी हंगामात मुंबईसाठी खेळू शकणार नाहीये. सोमवारी (18 मार्च) मुंबई फ्रँचायझीने बेहरनडॉर्फच्या जागी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ल्यूक वूड याला सामील केले आहे.
आयपीएलच्या 17व्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा संघ – रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, इशान किशन, देवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, विष्णू विनोद, रोमॅरियो शेफर्ड, शम्स शेफर्ड. नेहल वढेरा, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मधुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी.
महत्वाच्या बातम्या –
- शिअरफोर्स आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग: भारती विद्यापीठ संघाने पटकावले विजेतेपद
- हॉकी पंजाबला हरवून हॉकी मिझोराम संघ पूल एफमधून उपांत्यपूर्व फेरीत