पाकिस्तान सुपर लीग 2024 (PSL 2024) च्या अंतिम सामन्यादरम्यान एक धक्कादायक दृश्य दिसलं जे एकूणच क्रिकेट या खेळासाठी अत्यंत वाईट आहे. पीएसएल चॅम्पियन बनलेल्या इस्लामाबाद युनायटेडचा स्टार अष्टपैलू इमाद वसीम लाईव्ह मॅच दरम्यान ड्रेसिंग रूममध्ये सिगारेट ओढताना दिसला. ड्रेसिंग रूम ही अशी जागा आहे जिथे सामन्यादरम्यान संघाचे खेळाडू एकत्र बसतात. तिथेच इमाद वसीमनं सिगारेट ओढण्यास सुरुवात केली.
इमादच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इमाद वसीम ड्रेसिंग रूममध्ये बसला असून तो डाव्या हातानं सिगारेट ओढत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय. सिगरेटची एक झुरकी घेतल्यानंतर इमादला कदाचित लक्षात आलं की कॅमेरा त्याच्यावर आहे, त्यानंतर तो पटकन सिगारेट खाली लपवतो आणि नंतर हळूहळू धूर सोडतो. इमादची ही कृती कॅमेऱ्यात पूर्णपणे कैद झाली आहे. सामन्याच्या पहिल्या डावात त्यानं हे कृत्य केलं. यावरून आता त्याच्यावर चौफेर टीका होत आहे.
Not a fan but imad wasim is the most relatable one. Blud is skillful, talented , badtameez, arrogant, has got swagger and foresquare , gives proper engineer type vibes, would’ve been a great addition in our boys hostel #PSLFinal #MSvIU #HBLPSLFinal pic.twitter.com/wTUuFvB9Ni
— U M A R (@Agrumpycomedian) March 18, 2024
असं असलं तरी, गोलंदाजी करताना मात्र इमादनं जोरदार कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्यानं सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुलतान सुलतानच्या पाच फलंदाजांना बाद केलं. इमादनं 4 षटकात केवळ 23 धावा देत 5 बळी घेतले.
दोन संघांमधील हा सामना अत्यंत अटीतटीचा झाला. प्रथम फलंदाजी करताना मुलतान सुलतान संघानं 20 षटकात 9 गडी बाद 159 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इस्लामाबाद युनायटेडला शेवटच्या षटकात 8 धावांची गरज होती. यावेळी इमाद वसीम आणि नसीम शाह क्रीजवर होते. दोघांनी मिळून 4 चेंडूत 7 धावा केल्या. आता 2 चेंडूत 1 धावांची गरज होती. तेव्हा क्रीजवर असलेला नसीम शाह पाचव्या चेंडूवर बाद झाला. यानंतर फलंदाजीसाठी हुनैन शाहला 1 चेंडूवर 1 धाव काढायची होती. मात्र त्यानं सरळ चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! IPL 2024 पूर्वी विराट कोहलीनं सुरू केला सराव, व्हिडिओ व्हायरल
पाकिस्तानची फजीती, PSL 2024च्या अंतिम सामन्याआधी पत्रकारांकडून बहिष्कार; वाचा संपूर्ण प्रकरण
अर्रर्र.. पाकिस्तान संघ आला रडकुंडी,कोणी मिळत नाही नवीन कोच, आता ‘या’ दिग्गजाने दिला नकार