---Advertisement---

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! IPL 2024 पूर्वी विराट कोहलीनं सुरू केला सराव, व्हिडिओ व्हायरल

---Advertisement---

आयपीएल 2024 चा हंगाम सुरू होण्यासाठी आता फक्त 4 दिवस बाकी आहेत. त्यापूर्वी सर्व संघांच्या खेळाडूंनी सराव सुरू केलाय. 22 मार्चला या हंगामातील पहिल्या सामन्यात फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची लढत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जशी होईल. उभय संघांमधील सामना 22 मार्च रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जाईल.

या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये स्टार खेळाडू विराट कोहलीसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे इतर खेळाडू सराव करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि कॅमेरून ग्रीन व्यतिरिक्त रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे इतर खेळाडू दिसत आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे हे सर्व खेलाडू एन. चिन्नास्वामी स्टेडियमवर घाम गाळत होते. विराट कोहली बऱ्याच कालावधीनंतर मैदानात परतला आहे. अलीकडेच तो भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत खेळला नव्हता. आता तो पुन्हा एकदा मैदानावर दिसल्यानं चाहत्यांमध्ये उत्साह आहे. विराटचे मैदानावर ट्रेनिंग करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.

 

विराट कोहलीच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यानं 2008 मध्ये पदार्पण केलं होतं. विराट कोहलीनं आतापर्यंत 237 सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं प्रतिनिधित्व केलं. या दरम्यान त्याच्या नावावर 130.02 चा स्ट्राईक रेट आणि 37.25 च्या सरासरीनं 7263 धावा आहेत. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणार फलंदाज आहे. विराट कोहलीनं आयपीएलमध्ये 7 शतकं झळकावली आहेत. याशिवाय त्यानं 50 सामन्यांमध्ये अर्धशतकांचा टप्पा ओलांडला आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना 22 मार्च रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जाईल.  रेकॉर्डवर नजर टाकली तर या दोन संघांमध्ये आतापर्यंत एकूण 31 सामने खेळले गेले. यापैकी चेन्नईनं 20 तर बंगळुरूनं 10 सामने जिंकले आहेत. आयपीएल 2024 मध्ये महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा चेन्नईचं नेतृत्व करताना दिसेल. तर बंगळुरूची कमान दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसच्या हाती आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल 2024 पूर्वी चेन्नईचा आणखी एक गोलंदाज जखमी, स्ट्रेचरवर नेलं मैदानाबाहेर

“कर्णधार बनल्यानंतर रोहित शर्माशी बोलला का?”, हार्दिक पांड्याचं उत्तर ऐकून बसेल धक्का!

जबरदस्त! राशिद खानचा ‘नो लूक’ षटकार, चेंडू सरळ मैदानाबाहेर!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---