---Advertisement---

पाकिस्तानची फजीती, PSL 2024च्या अंतिम सामन्याआधी पत्रकारांकडून बहिष्कार; वाचा संपूर्ण प्रकरण

---Advertisement---

पाकिस्तान सुपर लीग 2024चा अंतिम सामना सोमवारी (18 मार्च) खेळला जाणार आहे. मुल्तान सुल्तान विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड या संघांमध्ये लीगचा हा अंतिम सामना होईल. या सामन्याआधी पाकिस्तानमधून एक बातमी मसोर येत आहे. अंतिम सामन्याच्या एक दिवस आधी मुल्तान सुल्तान संघाच्या पत्रकार परिषदेत वेगवेगळ्या माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते. पण पत्रकार परिषदेत असे काहीतरी घडले, ज्यामुळे सर्व पत्रकारांनी तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

क्रिकेटजगतात असे याआधी कधीच झाले नसेल, की पत्रकार आणि मुलाखतदार यांच्यात वाद झाला आहे. पण रविवारी (18 मार्च) पाकिस्तानमध्ये असे होताना दिसले. चालू पत्रकार परिषद सुरू असताना सर्व पत्रकार तिथून निघून गेले. तुम्हीही असा प्रकार दगाचित पहिल्यांदाच पाहिला असेल. माध्यमांतीव वृत्तांनुसार पाकिस्तान प्रीमियर लीग म्हणजेच पीएसएस 2024च्या अंतिम सामन्यापूर्वी हा प्रकार घडला आहे.

आयपीएलच्या बातम्यांसाठी आताच व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा!- इथे क्लिक करा

मुल्तान सुल्तान संघाकडून ही पत्रकार परिषद आयोजित केली गेली होती, पण प्रत्यक्षात संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान माध्यमांसमोर आलाच नाही. मुल्तान सुल्तानचे व्यवस्थापन या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. पत्रकारांच्या म्हणण्यानुसार पत्रकार परिषदेसाठी कर्णधार किंवा संघातील एकादा वरिष्ठ खेळाडू उपस्थित हवा होता. याच कारणास्तव पत्रकार आणि संघाच्या व्यवस्थापनांमध्ये शाब्दिक चकमक झाली. एका पाकिस्तानी पत्राकाराच्या माहितीनुसार व्यवस्थापकांकडून पत्रकारांनी चुकीच्या वद्धतीने वागणूक मिळाली, ज्यामुळे सर्वजण तिथून निघून आले. पत्रकारांकडून वरिष्ठ खेळाडूशी बोलण्याची मागणी केली गेली. पण व्यवस्थापन असे म्हणाले की, “हे तुमच्या मनाने नाही होणार. तुम्हाला थांबायचे असेल तर थांबा नाहीतर जाऊ शकता.”

दरम्यान, मुल्तान सुल्तान आणि इस्लामाबाद युनायटेड य़ांच्यातील पीएसएल 2024चा अंतिम सामना कराचीमध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघ दुसऱ्यांदा पीएलएल ट्रॉफी उंचावण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. इस्लामाबाद पहिल्यांदा 2018 मध्ये चॅम्पियन बनला होता, तर मुल्तान सुल्तान संघाने 2024 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. (Journalist boycotted Multan sultan’s press conference Before the finals)

महत्वाच्या बातम्या – 
CSK vs RCB सामन्याच्या तिकिटांसाठी चाहत्यांची चढाओढ, बुकिंग सुरू होताच वेबसाइट क्रॅश
आरसीबीच्या विजयानंतर आलेल्या व्हिडिओ कॉलवर विराट कोहली काय बोलला? स्मृती मानधनाने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---